पंढरपुर-मंगळवेढा विधानसभा पोट निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर पांडूरंग परिवाराची महत्वपुर्ण बैठक

 



(पंढरपुर-मंगळवेढा पोट निवडणूकीबाबत पांडुरंग परिवार उद्या काय? महत्वपुर्ण निर्णय घेणार याकडे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले)



सोलापूर // प्रतिनिधी 

तीन महिन्यापूर्वी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आ. स्व.भारत नाना भालके यांचे निधन झाल्यामुळे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाची जागा रिक्त झाली आहे या जागेबाबत येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये पंढरपूर मंगळा विधानसभा मतदारसंघाची निवडणुकीची घोषणा होण्याची दाट शक्यता असून त्याच अनुषंगाने उद्या पांडुरंग परिवाराची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न होणार असल्याचे पांडुरंग परिवाराची व नेते माजी उपसरपंच प्रणव दादा परिचारक यांनी सांगितले आहे.


पंढरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणामध्ये ठीक सकाळी अकरा वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली असून आगामी पोट निवडणूक पांडुरंग परिवाराकडून लढवायची का नाही याबाबत चर्चा होणार असल्याचे समजते आहे ही बैठक प्रणव दादा परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असून यामध्ये पंढरपूर व मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमध्ये पांडुरंग परिवाराकडून कोणाला उमेदवारी द्यायची किंवा काय करायचे याबाबत सर्व ज्येष्ठ कनिष्ठ सर्व समर्थक कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात येणार आहेत.


ही बैठक ग्रामीण भागातील सर्व समर्थक व कार्यकर्त्यांसाठी आहे.

या बैठकी वरून पुढील चित्र स्पष्ट होणार असून पांडुरंग परिवारामध्ये ही निवडणूक लढविण्यास बाबतीत मोठा उत्साह दिसून येत असून सर्व समर्थक कार्यकर्ते यासाठी आग्रही असल्याचे चित्र पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघामध्ये दिसत आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget