सोलापूर // प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार करकंब (भोसे) येथील एक नव तरुण होतकरू व सर्व सामान्य जनतेचे प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून सोडविण्यासाठी आज महेंद्र पवार यांची सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून या नियुक्तीमुळे मा. राजसाहेब ठाकरे यांचे विचार तळागाळातील सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्तीचे पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस तथा शाॅडो कॅबिनेट मंत्री दिलीप (बापू) धोत्रे व तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत, महेंद्र पवार यांना प्रदान करण्यात आले.
व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. या निवडीनंतर करकंब व परिसरामधील सर्व नागरिकांनामधून महेंद्र पवार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. यावेळी महेंद्र पवार मनसे करंकब,मेजर राजू कांबळे, बाळु धोत्रे, रोहित धोत्रे, ॠषिकेश निंबाळकर आदि सर्व मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.