सोलापूर // प्रतिनिधी
सोलापूरातील वृत्तपत्र क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व पत्रकारांना शासनाच्या माध्यमातुन मोफत घरकुले देण्यासाठी घरकुल योजना राबवावी अशा मागणीचे निवेदन सोलापूर वृत्तपत्र पत्रकार संघाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा . श्री . उध्दवजी ठाकरे साहेब यांना देण्यात आले .
सोलापूर वृत्तपत्र पत्रकार संघाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा . श्री . उध्दवजी ठाकरे साहेब यांना देण्यात आलेल्या निवेदनात आमच्या सोलापूर वृत्तपत्र पत्रकार संघाच्या वतीने विविध सामाजिक , शैक्षणिक , सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्यात येतात तसेच शासनाचे विविध मागण्यांचा माहितीही प्रसिध्दी करून शासनाचे योजना यशस्वी होण्याबरोबर जनतेत प्रसिध्दी माध्यमातुन पोहोचविण्याचा काम करीत आहोत . परंतु आम्हा यत्रकारांना राहण्यासाठी निवारा नसल्याने आम्हा पत्रकार व आमच्या कुटुंबियांना फार हाल सहन करावे लागते . आणि सामाजिक भ्रष्टाचार , अवैद्य धंदे , अंध - श्रध्दानिर्मुलन व इतर अनेक समाज विरोधी होणारे प्रकरण उगडकीस आणत असल्याने आम्हाला व आमच्या कुंटुबियांच्या जिवीतास धोका आहे . अशा सर्व परिस्थितीचा विचार करता आम्हा पत्रकारांसाठी स्वतंत्र योजना शासनाच्या माध्यमातुन राबवावी ही विनंती .
तरी माननीयांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या नात्याने सोलापूर वृत्तपत्र पत्रकार संघाच्या सदस्य असलेल्या सर्व पत्रकारांसाठी स्वतंत्र घरकुल योजना करावी . ही नम्र विनंती असे नमुद करण्यात आले आहे . त्याचबरोबर *१) पत्रकारांना ई.एस.आय. कायदा लागु करावे , २) पत्रकारांना प्रधानमंत्री आवास योजनेत समाविष्ट करावे . ३) पत्रकार महामंडळ स्थापना करावे . ४) पत्रकारांसाठी पेन्शन योजना चालू करावे. मागण्यांचा समावेश निवेदनात केला गेला आहे .

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.