सोलापूर जनता बॅंकेच्या 53 हजार 334 पैकी 30 टक्‍केच मतदान; मंगळवारी निकाल जाहीर होणार!



सोलापूर // प्रतिनिधी

सोलापूर जनता सहकारी बॅंकेची निवडणूक 2010 नंतर प्रथमच झाली. या निवडणुकीत दहा अपक्ष उमेदवारांनी निवडणूक लढविली. दुसरीकडे सत्ताधारी परिवार पॅनल तर बॅंक बचाव पॅनलचे प्रत्येकी 17 उमेदवार रिंगणात होते. मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असून मतपत्रिकेवर ही निवडणूक पार पडली. एकूण 44 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून मतमोजणी आता 16 मार्च रोजी होणार आहे. नुतन मराठी विद्यालयाच्या सभागृहात सकाळी 8 वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे.


बॅंकेचे कार्यक्षेत्र दोन राज्यात असून सोलापूर जनता सहकारी बॅंकेचे सोलापूर शहर-जिल्ह्यातील तब्बल 40 हजारांपर्यंत सभासद आहेत. तर उर्वरित सभासद विजयपूरसह (कर्नाटक) पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, बीड, उस्मानाबाद अशा खानदेश, मराठवाडा व पश्‍चिम महाराष्ट्रातील सभासद आहेत. सध्या कोरोनाचा जोर वाढू लागल्याने बाहेरील सभासदांनी मतदानासाठी पाठ फिरविल्याचे पहायला मिळाले. सकाळी 8 वाजता मतदानाला सुरवात झाली आणि दुपारी चार वाजेपर्यंत अवघे 25 टक्‍केच मतदान झाले होते. पुढील एका तासात अवघे पाच टक्‍क्‍यांपर्यंत मतदान झाल्याचा अंदाज सहकार विभागातील अधिकाऱ्यांनी वर्तविला. 2010 नंतर प्रथम बॅंकेच्या संचालकांची निवडणूक पार पडली असून यामध्ये सतीश पाटील-वडकबाळकर यांनी बॅंक बचाव पॅनलच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान उभे केले. तर सत्ताधाऱ्यांच्या सत्ताधारी परिवार पॅनलचे नेतृत्व किशोर देशपांडे यांनी केले. या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे लक्ष लागले असून मंगळवारी (ता. 16) मतदारांचा कौल समजणार आहे. 

यामध्ये सोलापूर :- 30156 पैकी 7009,

अक्कलकोट :- 1671 पैकी 620

मोहोळ :- 1056 पैकी 345,

माढा :- 696 पैकी 286,

पंढरपूर :- 2310 पैकी 726,

सांगोला :- 801 पैकी 204,

माळशिरस :- 992 पैकी 450,

बार्शी :- 2663 पैकी 936,

उमरगा :- 1378 पैकी 364,

उस्मानाबाद :- 2046 पैकी 654,

कसबे तडवळ:- 583 पैकी 361,

कळंब :- 878 पैकी 551,

लातूर :- 3378 पैकी 881,

बीड :- 133 पैकी 35,

नांदेड :- 346 पैकी 10,

औरंगाबाद :- 275 पैकी 39,

नाशिक :- 229 पैकी 25,

पुणे :- 2305 पैकी 120,

मुंबई :- 1315 पैकी 25,

कोल्हापूर :- 158 पैकी 22,

विजजापुर :- 171 पैकी 112,

उदगीर :- 830 पैकी 376,अशाप्रकारे एकूण मतदान 53538 पैकी 14151 २६.४३% मतदान झाले आहे

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget