घटनेची जबाबदारी न पाळणारा राज्यपाल कधी पाहिला नाही, शरद पवारांचं टीकास्त्र




वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

राज्यपाल नियुक्त आमदारांच्या मुद्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली आहे. 'महाराष्ट्राच्या इतिहासात घटनेची जबाबदारी न पाळणारा राज्यपाल कधी पहिला नाही' अशा शब्दांत शरद पवारांनी टीका केली.


बारामतीमध्ये पत्रकारांशी बोलत असताना शरद पवार यांनी पश्चिम बंगाल निवडणुका आणि राज्यपाल नियुक्त आमदारांच्या मुद्यावर परखड मत मांडले.


'राज्यपाल नियुक्त आमदारांचा मुद्दा अजूनही प्रलंबित आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात लोकशाहीची आणि घटनेत असणारी जबाबदारी न पाळणारा राज्यपाल कधी महाराष्ट्राने पहिला नाही. नरेंद्र मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा तत्कालीन राज्यपालांनी त्रास दिला होता. आता तशाच प्रकारे भगतसिंग कोश्यारी वागत आहे. मात्र, केंद्र सरकार फक्त बघ्याची भूमिका घेत आहे, हे चिंताजनक आहे, अशी टीका शरद पवारांनी केली.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget