पंढरपूर शहरातील लिंकरोड भागातील नागरी वसाहतीचे कृषीनगर असे नामकरण करण्यात आले आहे. महिला दिनाचे औचित्य साधून नामकरण फलकाचे अनावरण नगराध्यक्ष साधना भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.
शासकीय सेवेतील कर्मचार्यांनी एकत्रित येत या वसाहतीची स्थापना केलीआहे. लिंकरोड जवळ असलेल्य़ा या वसाहतीमध्ये अनेक छोटे मोठे उद्योग,व्य़वसाय वाढले आहेत. त्यामुळे येथे नागरी वस्ती देखील मोठ्य़ा प्रमाणात वाढली आहे.
वाढत्या वसाहतीनंतर येथील रहिवाशांनी एकत्रित येत कृषीनगर असे नामकरण केले आहे. महिला दिनाच्या निमित्ताने सोमवारी (ता.8) कृषीनगर या नामफलकाचे अनावरण केेले. यावेळी नगराध्यक्ष साधना भोसले यांनी वसाहतीची पाहणी केली. त्यानंतर येथील नागरी सुविधांबाबत स्थानिक रहिवाशांसी चर्चाकेली. प्रास्ताविक भाषणात माजी प्राचार्य आर.डी.पवार यांनी वसाहतीमध्येकमी दाबाने होणारा पाणी पुरवठा व येथील अस्वच्छते बाबतच्या समस्या मांडल्या. त्यावर नगराध्यक्ष साधना भोसले व मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी तातडीने लक्ष घालून येथील समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी नगरसेवक प्रशांत शिंदे, माजी प्राचार्य आर.डी.पवार, शहाजी पाटील,सगुणा शेडगे,बळवंत कारंडे, रामचंद्र कांबळे,विश्वास बेंग्लोरकर,भारत राऊत, योगेश कंगळे,बाळासाहेब शिंदे,गणेश चौगुले,बाळासाहेब वाजगे,संभाजी शेळके,अकंशु डुबल,अमर गायकवाड,योगीता चव्हाण,शुभांगी वाजगे आदी उपस्थित होते. महिला दिनाच्या निमित्ताने ज्येष्ठा महिला द्रोपदी गायकवाड यांचा सत्कार नगराध्यक्षा सधाना भोसले
यांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन योगेश कंगळे यांनी सूत्रसंचालन
केले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.