परमबीर सिंगप्रकरणी राज ठाकरे आक्रमक




(राज ठाकरे यांची पत्रकार परिषद)


वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले असून, अनिल देशमुख यांनी सचिना वाझे यांना दर महिन्याला १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते, असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे. याप्रकरणी भाजप आक्रमक झाला असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांनी तात्काळ राजीनामा द्यायलाच हवा, अशी मागमी राज ठाकरे यांनी केली होती. त्यानंतर, आज पत्रकार परिषद घेऊन राज यांनी अनेक सवाल उपस्थित केले आहेत. 


मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग ह्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र अत्यंत धक्कदायक आहे. महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी ही घटना आहे. गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांनी तात्काळ राजीनामा द्यायलाच हवा आणि ह्या प्रकरणात त्यांची उच्चस्तरीय चौकशी देखील व्हायला हवी, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. त्यानंतर, आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत याप्रकरणाचा तपास केंद्र सरकारने करावा, केंद्राने यात हस्तक्षेप करावा, असे राज ठाकरेंनी म्हटलंय.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget