२५२-पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक जाहीर होऊन बराच कालावधी झाला आहे. यातच राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून भगिरथ (दादा) भालके यांची उमेदवारी निश्चित झाली आहे तर भारतीय जनता पार्टीकडून उद्योजक समाधान आवताडे यांची उमेदवारी निश्चित झाली आहे.
दोन्ही उमेदवार आपापले उमेदवारी अर्ज उद्या दि.30 मार्च रोजी भरणार आहेत. यावेळी दिग्गज नेते येणार असून राष्ट्रवादी पक्षाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदामंत्री जयंत पाटील तर भाजपाकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर,मा.खा. धनंजय महाडिक खा.डाॅ.जयसिद्धेश्वर महास्वामी व अन्य मोठे नेते उमेदवारी अर्ज भरताना उपस्थित राहणार आहेत.
दोन्ही उमेदवारांनी पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात गावभेट बैठकीचा धडाका लावला आहे. येत्या थोड्याच दिवसात या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा या पक्षातील बडे बडे दिग्गज नेते प्रचारासाठी येणार असल्याचे समजत आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.