सोलापूर // प्रतिनिधी
252 पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघासाठी भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्यावतीने कालच उद्योगपती समाधान दादा अवताडे, यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.
यावेळी पक्षाकडून अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्या दिनांक 30 मार्च ची शेवटची तारीख असल्यामुळे श्री क्षेत्र पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्माई चे दर्शन घेऊन उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे यावेळी समाधान दादा अवताडे यांनी सांगितले. यावेळी त्यांच्याबरोबर माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील,ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील आ. रणजितसिंह मोहिते पाटील खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर खासदार डॉ. जय सिद्धेश्वर महास्वामी, मा.खा. धनंजय ऊर्फ मुन्ना साहेब महाडिक,आमदार विजयकुमार देशमुख आमदार राजेंद्र राऊत त्याचबरोबर माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख रामहरी रुपनवर,आ.राम सातपुते, आमदार प्रशांत परिचारक,सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दादा देशमुख याच बरोबर भारतीय जनता पार्टीचे दिग्गज नेते मंडळी याप्रसंगी पंढरीमध्ये उमेदवारी अर्ज भरणार येणार असल्याचे समजते. यामुळे पंढरपूर तीर्थक्षेत्री मोठ्या प्रमाणात दिग्गज नेते मंडळी भारतीय जनता पार्टी कडून येणार असल्यामुळे आतापासून प्रशासनाकडून हालचालींना वेग आला आहे याच बरोबर पक्षाची अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यामुळे संपूर्ण पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील सर्व अवताडे समर्थकांमध्ये आनंदाचे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.