वृत्तसंस्था // प्रतिनिधी
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना त्रास जाणवून लागल्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आले होते. पित्ताशयाचा त्रास होत असल्यामुळे 31 मार्चला त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे, अशी माहिती मिळत आहे.
आज सकाळी शरद पवार हे ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आले होते. त्यांना पित्ताशयाचा त्रास होत होता. डॉक्टरांनी शरद पवार यांची तपासणी केली आहे. पित्ताशयाचा त्रास जास्त जाणवत असल्यामुळे बुधवारी 31 मार्च रोजी शस्त्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
त्यामुळे शरद पवार यांना पुढील सगळे कार्यक्रम रद्द करावे लागले आहे. त्यांना पश्चिम बंगाललाही प्रचाराला जाता येणार नाही. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी ममता बॅनर्जी यांच्या प्रचारासाठी शरद पवार जाणार होते. पण आता प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांना दौरा रद्द करावा लागला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे. शरद पवार यांना पोटात दुखू लागल्यामुळे रुग्णालयात तपासणी करण्यासाठी आले होते. पण, पित्ताशयाचा त्रास अधिक जाणवू लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 31 मार्च रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. त्यानंतर पुढील 2 आठवडे ते घरीच विश्रांती करणार आहे, या काळात त्यांचे सर्व दौरे रद्द करण्यात आले आहे, अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली.


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.