(भीमा परिवाराच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
स्व. भारत नाना भालके यांचे तीन महिन्यापूर्वी अकाली निधन झाले होते. त्यांच्या निधनामुळे पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघ पूर्णपणे पोरका झाला होता यानंतर पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने स्व. भारत नाना भालके यांच्या सरकोली येथील निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद चंद्रजी पवार साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत रावजी पाटील, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील याचबरोबर अनेक महाराष्ट्रातील व सोलापूर जिल्ह्यातील दिग्गज सर्व नेत्यांनी स्व. भारत नाना भालके यांना श्रद्धांजली अर्पण केली होती.
त्याचप्रमाणे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये भीमा परिवाराची ताकद खूप मोठ्या प्रमाणात असून विठ्ठल सहकारी साखर कारखाना व भीमा सहकारी साखर कारखाना यांचे सभासद हे एकच असून आज पर्यंत स्वर्गीय भारत नाना भालके व धनंजय महाडिक यांनी ज्या काही निवडणुका होत्या त्या एकत्रपणे लढल्या असून त्या जिंकल्या सुद्धा आहेत त्याचबरोबर स्व.भारत नाना भालके यांच्या परिवाराचे व धनंजय महाडिक यांच्या परिवाराचे निकटचे संबंध सर्वांना सर्वश्रुत आहेत.
भीमा परिवाराची ताकद व मते ही पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमध्ये निर्णायक ठरणार असून भीमा परिवाराचे नेते संसद रत्न मा.खासदार धनंजय ऊर्फ मुन्ना साहेब महाडिक हे काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण दोन्ही तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
सरकोली येथे झालेल्या अखेरच्या अंत्यविधीप्रसंगी कोल्हापूरचे मा. खा. भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन धनंजय महाडिक यांनी भगिरथदादा भालके यांच्या पाठीमागे ठामपणे सर्वांनी उभे रहावे, असे त्यांनी छोटेसे मनोगत आपल्या श्रद्धांजलीपर भाषणातून व्यक्त केले होते. या वेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी खासदार महाडिक यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही सर्वजण स्व.भारत नाना भालके यांच्या सर्व कुटुंब यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहू अशी ग्वाही दिली होती.
त्यावेळी मा खा. धनंजय महाडिक यांनी स्व. भारत नाना भालके यांच्या अनेक आठवणींना त्यांनी उजाळा दिला होता.आता त्याच अनुषंगाने पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाले असून पंढरपूर तालुक्यातील पूर्व भागातील सर्वात मोठा म्हणून गणला गेलेला भीमा सहकारी साखर कारखाना हा श्री धनंजय महाडिक यांच्या अधिपत्याखाली वाटचाल करीत आहे या कारखान्याचे सभासद बऱ्याच अंशी पंढरपूर तालुक्यातील सुद्धा आहेत ते सर्व स्व.भारत नाना भालके, यांच्या वर प्रेम करणारे आहेत.पंढरपूर तालुक्यातील पूर्व भागातील बऱ्याच गावांमध्ये भीमा व विठ्ठल सहकारी साखर कारखाने सुद्धा सभासद कामगार समर्थक व कार्यकर्ते असून या सर्वच समर्थक व कार्यकर्त्यांना स्व.भारत नाना भालके हे नेहमीच कारखान्याच्या प्रत्येक अडचणीमध्ये सहकार्य करण्याचे काम करीत होते.
याच अनुषंगाने आता भीमा परिवाराने आपली भूमिका जाहीर करावी व स्व.भारत नाना भालके यांच्या कुटुंब यांच्यामागे ठामपणे उभे रहावे अशी मागणी सर्व समर्थक व कार्यकर्ते करीत असल्याचे दिसत आहे.
पण खा. महाडिक यांनी समर्थक व कार्यकर्त्यांना कोणताही आदेश दिला नाही.
त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये भीमा परिवार आपली भूमिका स्पष्ट करेल असे सांगितले जात आहे.


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.