स्वाभीमानीचा वैराग येथे रस्तारोको आंदोलन




लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करा व सक्तीची वीजबिल वसुली थांबवा अन्यथा तीव्र आंदोलन करु - विजय रणदिवे.


वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करावे व सक्तीची विजबिल वसूली थांबवून कनेक्शन कापणे  तात्काळ थांबवावे व थकीत ऊसबिले तात्काळ जमा करा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांच्या नेतृत्वाखाली बार्शी - सोलापुर मार्गावर वैराग ता.बार्शी  येथे रास्तारोको करण्यात आला. 

  शेतकरी लॅकडाऊन,  अतिवृष्टी यामुळे अडचणीत आहेत त्यातच ऊसाची बिले मिळालेली नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांना वीजबिल भरणे शक्य नाही म्हणून सक्तीची वीजबिल वसुली तात्काळ थांबवा व लॉकडाऊन च्या कालावधीत सर्वांचे नोकरी,  व्यवसाय,  रोजगार बंद होते त्यामुळे लॉकडाऊन च्या कालावधीतील वीजबिल माफ करावे जर सरकारने लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ केले नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करु असा इशारा विजय रणदिवे यांनी यावेळी दिला 

अर्धातास चाललेल्या रास्तारोको मुळे  वाहनांच्या लांबच - लांब रांगा लागल्या होत्या त्यामुळे वैराग येथील मुख्य बाजारपेठ असलेल्या शिवाजी चौकात वाहतूक खोळंबली होती यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ही तैनात होता..

  या आंदोलनात हणमंत कापसे , चंद्रकांत निचळ, विजय साठे , दिनेश शिंदे , धर्मराज पंखे , सचिन मस्के , समाधान यादव, शरद निचळ,  केशव जगताप, महादेव शिंदे यांच्यासह शेतकरी व स्वाभीमानीचे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी सचिन मस्के , दिनेश शिंदे यांनी विचार व्यक्त केले

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget