वृत्तसंस्था // प्रतिनिधी
आज दिनांक ०५/०३/२०२१ रोजी दुपारी १२:०० वाजताच्या सुमारास Honda CB Unicorn Bike MH 04 JT 9279 (मालक:- श्री. राजेश बाबाजी जाधव) या दुचाकीवरून (ठाणे ते घोडबंदर) प्रवास करीत असताना ब्रम्हांड सिग्नल जवळ, घोडबंदर रोड, ठाणे येथे दुचाकी घसरल्यामुळे सदरच्या दुचाकी वरून प्रवास करणारा कु. आरूष राजेश जाधव (पु. / वय ०५ वर्षे) हा मुलगा बाजूने जाणारा ठा.म.पा. पाणीपुरवठा विभागाचा Water Tanker MH 04 KF 2392 (चालक- श्री. देवेंद्र सिताराम शिंदे, वय- ५३ वर्षे) या टँकरच्या मागील चाकाखाली येवुन जागीच मृत्यु झाला आहे.
सदर घटनास्थळी चितळसर-मानपाडा पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
सदर घटनेमध्ये कु. आरूषचे वडील- श्री. राजेश बाबाजी जाधव (पु./ वय ३३ वर्षे) व आई- श्रीमती. दर्शना राजेश जाधव (स्री/ वय २९ वर्षे) यांना किरकोळ दुखापत झाली. वरील जाधव कुटुंब हे रूम नंबर-१०४, इमारत क्रमांक-७, मैत्री पार्क, कशेळी, भिवंडी येथील रहिवासी आहेत. असे चितळसर-मानपाडा पोलिस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार सागन्यात येेते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.