वृत्तसंस्था // प्रतिनिधी
मौजे शिरवळ ता. अक्कलकोट, येथील कमलाबाई सुर्यकांत बंदीछोडे सोमनाथ सुर्यकांत बंदीछोडे व कलावती विठ्ठल बंदीछोडे या सर्वानी दि. १०/०२/२०२१ रोजी फिर्यादी परागबाई जनार्धन देडे हिला घरजागेच्या कारणावरून व पुर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून शिवीगाळ केली, धक्काबुकी केली म्हणून फिर्यादीने अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशन येथे अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता, या गुन्ह्यात कमलाबाई सुर्यकांत बंदीछोडे सोमनाथ सुर्यकांत बंदीछोडे व कलावती विठ्ठल बंदीछोडे यांना पोलीसांना दि. २०/०२/२०२१ रोजी अटक केले होते. या तिघांच्या वतीने अॅडव्होकेट भिमाशंकर एम. कत्ते यांनी विशेष न्यायधिश डि.के. अनुभुले यांच्या न्यायलयात जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. सदर अर्जाच्या सुनावणीमध्ये अॅडव्होकेट भिमाशंकर एम. कत्ते यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायधिशांनी कमलाबाई सुर्यकांत बंदीछोडे सोमनाथ सुर्यकांत बंदीछोडे व कलावती विठ्ठल बंदीछोडे सर्व रा. शिरवळ यांना जामीनावर मुक्तता करण्याचा आदेश दिला. यात अर्जदार/आरोपी तर्फे अॅडव्होकेट भिमाशंकर एम. कत्ते यांनी तर सरकारतर्फे अॅडव्होकेट पवार यांनी काम पाहिले.
अॅडव्होकेट भिमाशंकर एम. कत्ते

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.