औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागीय कार्यालय सोलापुरात सुरू करावे.:- विष्णु कारमपुरी (महाराज)

 




सोलापूर // प्रतिनिधी 

सोलापूर जिल्ह्यामध्ये ११ तालुके आणि ४ M.I.D.C सोलापूरात मोठ्या प्रमाणात कारखाने , उद्योग , आणि M.I.D.C असल्या कारणाने औद्योगिक सुरक्षा व आरोग्य कार्यालयामार्फत कामकाज जलद गतीने होण्यासाठी सोलापूरात स्वतंत्र विभागीय कार्यालय असणे गरजेचे आहे . म्हणून सोलापूर विभागामध्ये सहसंचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य हे पद निर्माण करुन त्यासाठी स्वतंत्र कार्यालय निर्माण करावे . अशी मागणी महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री मा . दिलीप वळसे पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे . अशी माहिती महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे . 
            मा . कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना देण्यात आलेल्या निवेदनात औद्योगिक सुरक्षा व आरोग्य सोलापूर या कार्यालयात कारखाने अधिनियम १ ९ ४८ अंतर्गत सुमारे ३६०० इतके कारखाने नोंदणीकृत आहेत . सदर जिल्ह्यामध्ये एकूण ११ तालुके आहेत आणि ०४ एम.आय.डी.सी. आहेत . त्यामध्ये अतिधोकादायक कारखान्यांची संख्या १८ ( MAH ) , साखर कारखान्यांची संख्या ३६ , तसेच मुख्यत यंत्रमाग कारखाने , रसायने कारखाने , इंजिनिअरींग कारखाने आहेत . त्यामध्ये जिल्ह्याचा विकास होऊन नविन कारखाने वाढत आहेत . 
         कारखाने अधिनियम १९४८ च्या अंतर्गत कारखान्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांची संख्या ६४ ९९ ५ इतकी आहे . त्यापैकी ४८८० इतके महिला कामगार काम करीत आहेत . तसेच साधारण ० ९ इतके कामगार संघटना कामगारांच्या तक्रारी संदर्भात कार्यरत आहेत . सदर जिल्ह्यामधील कारखान्यात मागील चार वर्षात प्राणघातक अपघात -१४ , गंभीर अपघात ३७ , आगीची घटना - १८ इतके झालेले आहेत . 
              सोलापूर येथे उपसंचालक , औद्योगिक सुरक्षा व आरोग्य यांचे कार्यालय आहे . परंतु या संचालनालयाचे नियंत्रण अधिकारी हे सहसंचालक असून त्यांचे कार्यालय पूणे येथे आहे . कारखान्याचे नकाशे मंजुर करणे , नविन परवाना देणे , नुतनीकरण करणे , जादा कामाची सुट व असे इतर अनेक अधिकार सहसंचालक , पुणे -२ यांना आहे . त्यामुळे अशा कामासाठी पुणे येथे वारंवार जावे लागते . त्यासाठी वेळ खर्च करावा लागतो . त्यामुळे सोलापूर विभागामध्ये सहसंचालक या पदाची नियुक्ती झाल्यास कारखानदारांचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटणार आहे व त्याचा फायदा कामगारांनाही होणार आहे . 
            सोलापूर येथे कारखान्या संबंधित प्रॉव्हिडंट फंड ऑफीस , महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळ , बॉयलर ऑफीस , प्रादेशिक सहसंचालक ( साखर ) सोलापूर विभाग , यांचे विभागीय कार्यालये सुरु आहेत . केवळ सोलापूर येथे सहसंचालक , औद्योगिक सुरक्षा व आरोग्य यांचे कार्यालय झाल्यास कारखानदार व कामगारांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे . 
            तरी माननीय महोदयांनी वरील विषयास सहानुभूतीपूर्वक विचार करुन सोलापूर येथे संचालक , औद्योगिक सुरक्षा व आरोग्य यांचे कार्यालय सुरु करावे . ही नम्र विनंती . असे नमूद करण्यात आले आहे .

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget