भंडीशेगांव येथे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण




वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

भंडीशेगांव(ता.पंढरपूर)येथे शहीद दिन,पंढरपूर चे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले व भंडीशेगाव येथील उद्योजक संतोष येलमार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपसरपंच संतोष ननवरे हे उपस्थित होते.

भंडीशेगांव या गावाची ओळख समृद्ध गाव अशी असावी यासाठी सोलापूर सोशल फाउंडेशन च्या माध्यमातून सतत विविध उपक्रम राबविले जातात, यामध्ये प्रामुख्याने वृक्षारोपण सर्वात महत्त्वाचे आहे, याच गोष्टीची गरज पाहून गावात वाढदिवसाच्या निमित्ताने व शहीद दिनाचे निमित्ताने एकत्रित वृक्षारोपण कार्यक्रम श्रीनाथ विद्यालयाच्या परिसरात घेण्यात आला.

वाढदिवस, जयंती,व महापुरुष यांच्या पुण्यस्मरण चे कार्यक्रम वृक्षारोपण करून साजरे करणे ही गावात एक प्रकारची नवीन प्रथाच पडली आहे.वाढदिवसाला अनावश्यक खर्च टाळून सामाजिक बांधिलकी जपत सर्वानी वृक्षारोपण करून गाव हरित ग्राम बनवावे असे मत यावेळी डॉ.अनिल कंडरे यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी सतीश रणखांबे,संतोष येलमार,रमेश शेगावकर,डॉ.श्रीधर येलमार,श्रावण येलमार,विश्वास सुरवसे,प्रकाश येलमार,मुख्याध्यापक विश्वजीत माने,अशोक भालेराव,प्रशांत कांबळे सह ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget