सोलापूर // प्रतिनिधी
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध होईल असे मागील तीन महिन्यांपूर्वी भाकीत वर्तविले जात होते. परंतु हे भाकीत पुर्णतः खोटे ठरले असून मागील आठवड्यापासून खरे चित्र समोर येऊन या निवडणुकीत जवळपास सर्वच राजकिय पक्ष या निवडणुकीत आपले उमेदवार उभे करण्यासाठी चढाओढ सुरू आहे.
अशातच विचारांची लढाई लढण्यासाठी बहुजन समता पार्टीनेही या निवडणुकीत कारखानदार आणि वारसदार यांच्या चढाओढीत आपलाही योग्य उमेदवार निवडणूक रिंगणात उतरउन एक चमत्कार घडविण्यासाठी जय्यत तयारी केली असून, अतिशय लोकप्रिय उमेदवार आपल्या पक्षात ओढला आहे.
शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा असणारा एक तगडा उमेदवार या निवडणुकीत उतरवून आपल्या बहुजन समता पार्टीची ताकद अवघ्या महाराष्ट्रात पोहचविण्याची रणनीती पक्षाचे संस्थापक प्रा. मच्छिन्द्र सकटेसर आखली आहे.
या निवडणुकीत आपल्या पक्षाचे ध्येयधोरणे समजावून सांगण्यासाठी संपूर्ण मतदार संघातील प्रत्येक भागात जनसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे.
या पक्षाचे वतीने येत्या27 मार्च रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. यासाठी पक्षाचे संस्थापक सकटे सर स्वतः या भागात तळ ठोकून आहेत.
याबत नुकतीच महत्वपुर्ण पदाधिकारी यांची एक बैठक घेण्यात आली होती, यावेळी इच्छुक उमेदवार आणि पदाधिकारी आगामी रणनीती आखली आहे.
यावेळी किशोर जाधव, सुनील अवघडे, पांडुरंग खिलारे, बळीराम रणदिवे, दगडू यादव, अमोल खिलारे, बाजीराव बंडगर, दत्ता शिंगाडे, श्रीमंत मस्के, मसुदेव काळे, पांडुरंग यादव, सोमा गायकवाड, धनाजी शिवपालक,बाबा खिलारे, शिवाजी लोखंडे, धनाजी काळे, संतोष रणदिवे, बाबुराव खिलारे, बाळासाहेब पाटील,चंद्रकांत साठे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.