पांडुरंग (तात्या) माने फाउंडेशनच्या वतीने भगीरथ (दादा) भालके यांना पाठिंबा. (रक्ताचे पाणी करू पण तुम्हाला संपूर्ण बहुमत देऊ: निलेश माने)

 


स्व.भारत (नाना) भालके यांच्या दुःखद निधन यामुळे 252: पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस कडून भगीरथ (दादा) बालक यांना उमेदवारी देण्यात येत असून त्यांनी पंढरपूर शहरातील विविध भागांमध्ये दोन दिवसांमध्ये कॉर्नर सभांचा धडाका सुरू केला असून यामध्ये त्यांनी काल पंढरपूर येथील जुनी पेठ कोळी गल्ली येथील कॉर्नर सभेला संबोधित केले. यावेळी पांडुरंग (तात्या) माने फाउंडेशनच्या वतीने विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भगीरथ (दादा) भालके यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पांडुरंग (तात्या) माने फाउंडेशनच्या कडून भगीरथ दादा भालके यांना जाहीर पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. यावेळी पांडुरंग तात्या माने फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निलेश माने यांनी यावेळी बोलताना आपले मनोगत व्यक्त केले त्यावेळी त्यांनी सांगितले की कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही आमच्या रक्ताचे पाणी करू व तुम्हाला पूर्ण ताकतीने आमदारच करू, त्याचबरोबर आमची सर्व तरून युवकांची फळी तुमच्यासोबत कायम राहील. असे यावेळी निलेश माने यांनी बोलताना सांगितले.


या कार्यक्रमाप्रसंगी मातोश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय(नान कोताळकर, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष अनिल (भाऊ) अभंगराव,राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्रीकांत शिंदे, रामभाऊ भिंगारे, संदीप मांडवे, जिल्हा कार्याध्यक्ष शंकर सुरवसे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप शिंदे, मोहम्मद उस्ताद, काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष  गणेश (भाऊ) माने, गणेश भिंगारे, बाबा संगमनेरकर, उमेश जाधव, बालाजी कोळी, प्रसाद कोळी, याचबरोबर समस्त कोळी समाजातील बहुसंख्य कार्यकर्ते याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget