बळीराजा शेतकरी संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी संपन्न

 


बळीराजा शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली जवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर व मोहोळ तालुक्यातील विविध पदाधिकार्‍यांच्या निवडी करण्यात आले यामध्ये पंढरपूर तालुका उपाध्यक्ष रामेश्वर नारायण झांबरे तसेच तालूका युवा संघटक आनंदा लामकाने मोहोळ तालूका आध्यक्षपदी विठ्ठल ढेकळे तर तालूका कार्य अध्यक्षपदी नामदेव गुंड या नुतन पदाधिका-यांच्या निवडी करण्यात आले आहे. गोरगरीब कष्टकरी शेतक-यांना अनेक आडचणींना सामोरे जावे लागते भविष्यात शेतक-यांना अशा आडचणी येवू नये यासाठी लढाई आहे तसेच सर्व सामान्य जनतेच्या न्याय हक्काच्या लढ्यासाठी आम्ही कायम तयार राहू असे मत व्यक्त ज्ञानेश्वर (माऊली) जवळेकर यांनी केले.  


यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे सोलापुर जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली जवळेकर,शिव सरपंच प्रदेश उपाध्यक्ष नितीन काळे, जिल्हा संघटक शेखर कोरके,नितीन गावडे, औंदूंबर सुतार,विजय झांबरे,भाऊसो तनपुरे,विष्णू भोसले,अजय झांबरे,महादेव झांबरे,खंडू लाडे,जोतिराम रोकडे सर,शिवाजी घाडगे,बाळासाहेब वाघमोडे आदि मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget