कामगार सेनेच्या वतीने महिला विडी कामगारांसाठी पर्यायी रोजंदार उपलब्ध करणार :- विष्णु कारमपुरी (महाराज)





सोलापूर // प्रतिनिधी 

शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने महिला विडी कामगारांसाठी पर्यायी रोजंदार उपलब्द करणार अशी घोषणा महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांनी कामगार सेनेच्या वतीने आयोजित केलेल्या महिला मेळाव्यात बोलतांना केले . 
           शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने जागतिक महिला दिना निमित्त माँ साहेब विडी घरकुल वसाहतीत विडी कामगार महिला मेळावा विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला . प्रारंभी श्री छत्रपती शिवाजी महाराज , श्री . बाळासाहेब ठाकरे , सौ . मिनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन रंगम्मा भैरी या महिला विडी कामगार यांच्या हस्ते करण्यात आले . त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्तावना श्री . प्रशांत जक्का यांनी केले . आपल्या अध्यक्षीय भाषणात कारमपुरी ( महाराज ) यांनी पुढे म्हणाले की , गेल्या १५ ते १६ वर्षापासुन विडी उद्योग धुम्रपान कायद्यात समावेश केल्याने विडी उद्योग संकटात आले आहे . आणि दिवसेंदिवस धुम्रपान कायदा जाचकच होत असल्याने त्याचा परिणाम उद्योजका बरोबर महिला विडी कामगारांनी भोगावे लागत आहे . त्यांचे प्रमाण इतके भयानक आहे की , महिला विडी कामगारांचे जगणेच मुश्कील झाले आहे . आणि कामही कमी मिळतो , पगार ही कमी मिळतो अशा इतर अनेक बाबींमुळे महिला विडी कामगार हवालदिल झालेले आहेत . म्हणून शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने महिला विडी कामगारांसाठी पर्यायी रोजंदारी निर्माण करण्यात येईल असे सांगितले . सदर मेळाव्यात विशाल चिलवेरी, सुदशर्न यनगंटी, प्रशांत जक्का यांनी आपले विचार मांडले. शेवटी नरेश अन्नलदास यांनी आभार मानून मेळावा संपल्याचे जाहिर केले . सदर मेळाव्यास महिला विडी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget