आश्रमशाळेतील दहावीची मुलगी गर्भवती ; रक्तस्त्राव झाल्याने प्रकार आला उघडकीस.




वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

आदिवासी विकास प्रकल्प जव्हार अंतर्गत येणाऱ्या साकुर येथील एका आश्रमशाळेतील इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेली मुलगी गरोदर असल्याचं समोर आल्यानंतर सगळ्यानाच धक्का बसला आहे.  वैद्यकीय तपासणी केल्यानंतर विद्यार्थिनी दोन महिन्यांची गर्भवती असल्याचं निष्पन्न झालं.  मुलीला अचानक रक्तस्राव आणि उलट्या सुरू झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जव्हार तालुक्यातील ८ किमी अंतरावर असलेल्या आश्रमशाळेतील एका मुलीला शाळेत असताना  रक्तस्राव व उलट्या होऊ लागल्या. 

त्यामुळे तिला प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्र साकुर येथे शाळेतील महिला अधिक्षिकांनी उपचारासाठी दाखल केलं. तिथे तिची गर्भ चाचणी करण्यात आली. तिथेच ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. पुढील उपचारासाठी तिला जव्हारच्या कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरू असताना तिला पुन्हा खूप रक्तस्राव सुरू झाले.

 त्यामुळे तिची प्रकृती खालावत होती म्हणून  तिला नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात असून, तेथे तिची पुन्हा वैद्यकीय चाचणी करण्यात आली.  त्यात ती विद्यार्थिनी दोन महिन्यांची गर्भवती असल्याचे उघड झाले आहे. तिच्यावर पुढील उपचार सुरू आहेत.

 तिच्यासोबत शाळेतील महिला अधीक्षक व मुलीचे पालक आहेत. साकुर येथील ही आश्रमशाळा पाहिले ते बारावीपर्यंत निवासी कन्या शाळा आहे.  येथे नववी ते बारावीचे वर्ग सुरू असून, वसतिगृहात १५६ विद्यार्थी पट संख्या आहे.  तर शाळेत ११५ विद्यार्थी उपस्थितीत असतात.  ही मुलगी ७ फेब्रुवारी रोजी पासून शाळेत उपस्थित आहे. गावातील एका मुलासोबत तिचे प्रेमसंबंध होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget