दैनिक लोकाशा हल्ला प्रकरणी कारवाई करण्याची पत्रकार सुरक्षा समिती ची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी





सोलापूर // प्रतिनिधी

बीड येथील दैनिक लोकाशा वृतपत्र मधून मुख्यमंत्री यांच्या बाबत बातमी लावली होती त्या बातमी चा राग मनात धरून बीड मधील शिवसैनिकांनी दैनिक लोकाशा कार्यालयात घुसन कार्यालयाची मोडतोड करून पत्रकार व संपादक यांना मारण्याची धमकी दिली आहे या घटनेचा पत्रकार सुरक्षा समिती वतीने निषेध व्यक्त करून हल्लेखोरावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली असून जिल्हाधिकारी सोलापूर यांना निवेदन सादर करण्यात आले आहे

ही लोकशाही की ठोक शाही यशवंत पवार यांचा मुख्यमंत्री यांना संतप्त सवाल

राज्यात पत्रकारांवर वाढते हल्ले चिंतेची बाब असून लोकशाही चा चौथा स्तंभ आज अडचणीत सापडला असून बातमी लावण्या वरून हल्ले होत असतील तर पत्रकारिता करायची कशी? असा जळजळीत सवाल मुख्यमंत्री यांना विचारला असून दैनिक लोकाशा कार्यालयात झालेल्या मोडतोड प्रकरणी मुख्यमंत्री यांनी जातीने लक्ष घालून हल्लेखोरावर तडीपार ची कारवाई करण्याची मागणी लावून धरली असून मुख्यमंत्री देखील दैनिक सामना चे कार्यकारी संपादक म्हूणन काम पाहिल्याने पत्रकारांच्या व्यथा वेदना त्यांना चांगल्या ठाऊक असून दैनिक लोकाशा कार्यालयात घुसून मोडतोड करणाऱ्या हल्लेखोरावर नक्कीच कडक कारवाई करतील अशी अपेक्षा केली आहे

यावेळी शहर अध्यक्ष डॉ रवींद्र सोरटे उपाध्यक्ष बिपीन दिड्डी सचिव अभिषेक चिलका, कार्याध्यक्ष आन्सर तांबोळी, सिद्राम येलदी, अप्पाशा म्हेत्रे, अशोक माचन, सौरभ सासवे, वैजिनाथ बिराजदार, विवेकानंद खेत्री, संतोष खलाटे, इम्तियाज अक्कलकोटकर, दत्ता फाळके नवाज शेख डी डी पांढरे प्रदीप पेदापल्लीवार आदर्श धडे इत्यादी पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget