संत दामाजी कारखान्याच्या गळीत हंगाम सांगता समारंभ संपन्न





सोलापूर // प्रतिनिधी

सन २०२०-२१ चा गळीत हंगाम ऊस उत्पादक शेतकरी, वाहतुक ठेकेदार व कामगार यांच्या विश्वासावर चांगल्या प्रकारे चालवला आणि कामगारांनी शेतक-यांचा राजवाडा जोपासण्याचे चांगले काम केले असे मत साखर कारखान्याच्या २८व्या गळीत हंगामाच्या सांगता समारंभप्रसंगी चेअरमन समाधान आवताडे यांनी व्यक्त केले।

याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे म्हणाले की, जिल्हयातील प्रत्येक कारखान्याने टार्गेट ठेवले होते परंतु  एकही कारखाना ठरविलेल्या उद्दिष्ठापर्यंत जावू शकला नाही। निसर्गाच्या अनियमिततेमुळे कोणताही कारखानदार हा ठरलेले अंदाज पूर्ण करु शकला नाही। ऊस पेमेंट, व्यापारी पेमेंट व कामगारांचा पगार कसा दयावयाच्या अशा अनेक अडचणी प्रत्येक कारखानदारावर आलेल्या आहेत। दामाजी कारखान्यावर सभासदांचा विश्वास आहे आणि तो विश्वास असलेला शेतक-यांचा राजवाडा अबाधित ठेवण्याचे काम आमच्या संचालक मंडळाने केलेले आहे। कामगारांचे राहिलेले पगार लवकरात लवकर करणार आहोत। ज्याप्रमाणे कारखान्यात ऊस तोडणी,वाहतुक ठेकेदार व बैलगाडीवान यांच्या पाठीवर थाप मारुन सत्कार होतो।  त्याचप्रमाणे कारखान्यांतील प्रत्येक विभागातील कामगारांनी चांगले काम करुन दाखवावे म्हणजेच त्यांच्याही पाठीवर थाप मारुन सत्कार करणेत येईल। चांगले काम करणा-या कामगारांना चालना दिली पाहिजे। दामाजीच्या कामगारांनी शेतक-यांचा असणारा राजवाडा जोपासण्याचे काम उस्फुर्तपणे केलेले आहे। येणारा सिझन २०२१-२२ या गाळप हंगामात चांगले नियोजन करुन आतापासूनच त्याची तयारी करुन तो हंगाम चांगल्या पध्दतीने चालणेसाठी प्रयत्न केला पाहिजे आणि येणा-या अनंत अडचणीवर मात करुन तो हंगाम यशस्वी करु। कारखाना चांगल्या  कार्यक्षमतेने चालविल्याने सर्व शेतकरी बंधु, अधिकारी , कामगार व ऊस तोडणी वाहतुक ठेकेदार यांचे आभार मानले। दामाजी कारखाना शेतक-यांचा असल्याने संपूर्ण ऊसाचे गाळप केल्याशिवाय कारखाना बंद करावयाचा नाही असा निर्णय संचालक मंडळांनी घेवून आज संपूर्ण ऊसाचे गाळप करुन सांगता समारंभाचे आयोजन केले आहे। तसेच पुढील हंगामाकरिता आùफ सिझनमधील सर्व कामे कामगारांनी वेळेवर पूर्ण करावी असे त्यांनी आवाहन केले।

    कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त ऊस पुरवठा करणारे तोडणी वाहतुक ठेकेदार,बैलगाडी व डंपींग ट्रक्टर ठेकेदार, वाहन मालक,मुकादम,मजूर यांचा बक्षीस देवून सत्कार करण्यांत आला।

        कारखान्याचे कार्यकारी संचालक झुंजार आसबे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करुन आपले मनोगत व्यक्त केले। यामध्ये ते म्हणाले आपल्या कारखान्याने १२३ दिवसात ३ लाख ७१ हजार ४९७ मे।टन ऊसाचे गाळप केलेले आहे। आपल्या कारखान्याची गाळप क्षमता २५०० मे।टन प्रतिदिन असताना सुध्दा सरासरी ३०२० मे।टन प्रतिदिन गाळप केलेले आहे। त्यामध्ये बगùस २६ हजार मे।टन, मोलासेस १५ हजार ८२६ मे।टन आणि प्रेसमड १० हजार टन इतके उत्पादन झालेले आहे। परंतु संचालक मंडळांनी आर्थिक अडचणी व अत्यंत काटेकोरपणे व्यवस्थापन केल्याने व त्यास कामगारांनी सहकार्य केल्याने गाळप हंगाम चांगल्या प्रकारे पार पडला। यावर्षीच्या स्टापेजेसमध्ये झालेल्या चुका पुढील वर्षी होणार नाहीत याची दक्षता घेणार आहोत। आपणास ४,५०,००० मे।टन गाळप अपेक्षित होते आपण तिथंपर्यंत पोहचू शकलो नाही। आपल्या कार्यक्षेत्रात को-२६५ या जातीच्या ऊसाचे प्रमाण ९० टक्के असलेने रिकव्हरी कमी लागत आहे। आपण लवकरच ऊस विकास अधिकारी हे पद भरुन ८६०३२ आणि ८००५ या जातीच्या ऊसाची लागवड जास्तीत जास्त वाढविणेसाठी प्रयत्न करुन ऊस विकासाच्या निरनिराळ्या योजना राबवणार आहोत।

        कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून  व्हा।चेअरमन अंबादास कुलकर्णी हे होते।यावेळी कारखान्याचे  संचालक लक्ष्मण जगताप,राजीव बाबर,रामकृष्ण चव्हाण,शिवयोग्याप्पा पुजारी, भुजंगराव आसबे, बाळासाहेब शिंदे, अशोक केदार, बसवेश्वर पाटील, मारुती थेारबोले,सुरेश भाकरे,विजय माने यांचेसह भारत निकम,प्रमोदकुमार म्हमाणे तसेच इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समीतीचे चेअरमन आबासाहेब  फडतरे, माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत पडवळे, नगरसेवक अनिल बोदाडे,दिपक माने,जंगलगीचे सरपंच राजु पाटील,म्हिंद्र देवकते,शिवाजी मोहिते, भारत आतकरे,अशोक भिंगे, कारखान्याचे सर्व अधिकारी वर्ग,सर्व कर्मचारी,सभासद,शेतकरी, तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते।

    हा गळीत हंगाम यशस्वी करणेसाठी कारखान्याचे सभासद,शेतकरी, अधिकारी,कर्मचारी तोडणी वाहतुक ठेकेदार, बैलगाडी मुकादम, ऊस तोडणी मजुर, सिझन कंत्राटी कामाचे ठेकेदार यांनी मोलाचे सहकार्य केले।या सर्वांनी मोठे योगदान दिलेबद्दल उपस्थितांचे आभार संचालक राजेंद्र सुरवसे यांनी मानले.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget