ऊस पाचटाचे वजन निश्चितीसाठी अभ्यास गटाची स्थापना करण्यात येणार!




सोलापूर // प्रतिनिधी 

यांत्रिक मशीन ऊस तोडणी केल्यास वजावट करावयाचे पाचटाचे वजन निश्चित करण्यासाठी राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी अभ्यास गटाची स्थापनेचा आदेश काढला आहे त्यानुसार पाडेगाव ऊस संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ सुभाष घोडके यांच्या अध्यक्षतेखाली 14 सदस्यीय अभ्यास गटाची स्थापना करण्यात आली आहे.

 या गटामध्ये सदस्य म्हणून वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटचे शास्त्रज्ञ पी. पी. शिंदे, पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी, राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक रामचंद्र माहुली, जवाहर चे कार्यकारी संचालक मोहन जोशी, सह्याद्रीची कार्यकारी संचालक अ.बी. पाटील, अंबालिका शुगर चे मानसून तावरे, कृषिभूषण शेतकरी संजीव माने, पांडुरंग आवाड, गंगामाई चे मुख्य शेती अधिकारी रमेश कचरे, संजय खताळ, वेस्ट इंडियन शुगर चे अजित चौगुले, डेक्कन शुगर चे एस.एस. गंगावती व सदस्य सचिव म्हणून पांडुरंग शेळके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 


डोकी सेंटर, गाडी सेंटर व बैलगाडी इत्यादी द्वारे उस ोडणी होणार्‍या 1 टक्का आळे बांधणी परतीची कपात करण्याचा नियम आहे. परंतु आहे स्टिंगद्वारे करण्यात येणाऱ्या तोडणीस किती टक्के कपात करावी याबाबत निश्चित धोरण नव्हते. त्यामुळे काही कारखान्यांनी यांत्रिककरणाद्वारे केलेल्या ऊस तोडणीस 5 टक्‍क्‍यांपर्यंत पाचट कपात करण्यात येत होती. यावरती शेतकरी संघटनेच्या मागणीनुसार कारखान्यांनी 1 टक्के पाचट कपात केलेली आहे.


परंतु यांत्रिक तोडणीच्या माध्यमातून येणारी पाचट, कवळी, कांडी, वाढे, शेता मधून येणारा चिखल, मा की याचा अभ्यास करून योग्य ती कपात करण्याचे धोरण ठरविणे आवश्यक आहे. म्हणून साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी हार्वेस्टर मधून सुटणाऱ्या उसातून किती वजावट करावी याबाबत निश्चित धोरण ठरविण्यासाठी अभ्यास गट स्थापन केला आहे.


ऊस तोडणी व्यवसायामध्ये काम करणारी दुसरी पिढी शैक्षणिकद्धष्ट्या शिक्षित होऊन नोकरी व आधुनिक व्यवसायाकडे वळली आहे. त्यामुळे ऊस तोडणी मजुरांची कमतरता साखर उद्योगास दिवसेंदिवस भासणार आहे. यावरती पर्याय म्हणून कारखान्यांना यांत्रिक ऊस तोडणी करणे काळाची गरज आहे.

यांत्रिकीकरणाने ऊस तोडणी केल्यास खोडबा फुटण्याची प्रमाण चांगले राहून जमिनीलगत ऊसतोडणी झाल्यामुळे ऊस तुटल्यानंतर खोडकी छाटणी करण्याची गरज भासत नाही असे पांडुरंग कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद जयसिंह दाजी भुसनर यांनी मत व्यक्त केले.



:-

राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी पाचटाच्या वजन निश्चितीसाठी 14 सदस्य समिती तयार केली आहे त्या समितीमध्ये मला सदस्य म्हणून घेतल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो! त्याचबरोबर अभ्यास गटाच्या माध्यमातून तोडणी वाहतुकीतून पांचट व आळे बांधणी व इतर बाबीसाठी चांगल्या पद्धतीने मार्ग निघू शकतो.

डॉ. यशवंत कुलकर्णी कार्यकारी संचालक पांडुरंग सहकारी साखर कारखाना श्रीपुर

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget