ग्रामपंचायतीचे नगरपालिका व नगरपंचायतीत रुपांतर करण्याच्या प्रक्रियेत सरकारने राजकारण केले : आ. रणजितसिंह मोहिते-पाटील
कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेकडे राजकीय हेतूने पाहू नये
सोलापूर // प्रतिनिधी
अकलूज, महाळुंग-श्रीपूर आणि नातेपुते वा तीन ग्रामपंचायतींचे नगरपालिका व नगरपंचायतीत रूपांतर करण्याच्या प्रक्रियेत राजकारण व भेदभाव झाल्याचा आरोप आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी केला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधान परिषदेत आमदार रणजितसिंह मोहिते - पाटील बोलत होते. स्थिरीकरण योजनेकडे राजकीय हेतूने पाहिले जाऊ नये अशी विनंतीही आमदार मोहिते - पाटील यांनी सभागृहात केली.
विधान परिषदेत बुधवारी झालेल्या भाषणात आमदार रणजितसिंह मोहिते - पाटील यांनी अनेक महत्त्वपूर्ण प्रश्नांवर सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. ते म्हणाले नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या आधी राज्यातील तेरा ग्रामपंचायतींचे रूपांतर नगरपालिका व नगरपंचायतीमध्ये करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात होती. तसेच राज्य शासनाने निवडणूक आयोगाला कळविले होते. तरी देखील येथील निवडणुका लावण्यात आल्या. सोलापूर जिल्ह्यातील अकलूज, महाळूग-श्रीपूर आणि नातेपुते या तीन ग्रामपंचायतीचे रूपांतर अनुक्रमे नगरपालिका व नगरपंचायती मध्ये करण्याच्या सर्व शासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्या होत्या. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नगर विकास मंत्री एकनाथ शिदे, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आदी मंत्र्यांनी या संदर्भात सर्व मंजुरी दिल्या होत्या. त्यानंतर अंतिम आदेश बाहेर येणे राहिले होते. तरी देखील येथील निवडणुका लागल्या त्यामुळे या मुद्याबाबत भेदभाव झाल्याचा आरोप आमदार रणजितसिंह मोहिते - पाटील यांनी केला. वासंदर्भातमहाळुंग-श्रीपूर सारखी ग्रामपंचायत न्यायालयात गेली असून आता हा मुद्दा न्यायप्रविष्ट बनला असल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले. सन २००३ मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी कृष्णा-भीमा-मराठवाडा स्थिरीकरण योजना मंजूर करून घेतली होती. राज्यातील जिल्हे आणि २१ तालुक्यातील १२ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेली ही योजना गेल्या १७१८ वर्षापासून प्रलंबित आहे. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी जागतिक बँकेकडून निधी उपलब्ध करून ही योजना पूर्ण करण्याच्या हेतूने महत्वपूर्ण धोरण आखले होते. या योजनेकडे राजकीय हेतूने पाहू नये. यासंदर्भात राजकारण न करता जनतेच्या हिताला प्राधान्य देण्याची विनंतीही आमदार मोहिते - पाटील यांनी यावेळी केली. त्याशिवाय कोरोना संसर्गाच्या काळात व्हॅटिलेटर व ऑक्सिजन चा तुटवडा, दुष्काळ, अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती या नैसर्गिक संकट ग्रस्थाना नुकसान भरपाई देताना प्रशासनाची झालेली संभ्रमावस्था, हमी भावाने शेतकन्यांकडून पूर्ण मका खरेदी केली न जाणे, पोल्ट्री व दुग्ध व्यवसायीक शेतकऱ्यांच्या समस्या, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये परीक्षा चालू असताना त्यांचे वीज कनेक्शन तोडणे अशा अनेक मुद्यांवर आमदार रणजितसिंह मोहितेपाटील यांनी सभागृह व सरकारचे लक्ष वेधले. यावेळी मंत्रिमंडळात संबंधित मंत्री उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.