सोलापूरकडे निघालेला लाखोंचा गुटखा पकडला

 




सोलापूर // प्रतिनिधी 

बार्शीकडून सोलापूरच्या एका व्यापाऱ्याकडे निघालेला ९० पोती अवैध गुटका अन्न व औषध प्रशासनाने पकडला असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शासनाने बंदी घातलेला ९० पोटी गुटका एका टेम्पोतून  बार्शीकडून सोलापूरच्या दिशेने निघालेला असताना कारंबाजवळ पकडण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाला याबाबत खबर मिळाली असल्याने या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा लावला होता. गुटका घेऊन जाणारा टाटा टेम्पो क्रमांक एम एच ०६ एजी जी २०८८ हे वाहन कारंबाजवळ आले असता अधिकाऱ्यांनी थांबवले आणि तपासणी केली असता ९० पोती गुटका आढळून आला. पाच लाख ९२ हजार ६८० रुपये एवढ्या किमतीचा हा गुटका असून ही मोठी कारवाई मानली जात आहे. अन्न व औषध प्रशासनाने ही करावी करताच टेम्पोचालक इकबाल नदाफ हा पळून गेला आहे. त्याचा सहकारी मोहम्मद आरिफ मोहम्मद युसूफ बागवान (सोलापूर) याला मात्र ताब्यात घेण्यात आले. सदर गुटका सोलापूर येथील अस्लम तांबोळी याच्या मालकीचा असल्याचे त्याने सांगितल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तांबोळी याच्या सांगण्यावरून हा गुटका बार्शी येथील व्यापाऱ्याकडून आणला असल्याचेही त्याने सांगितले. 

  सदर कारवाईत दोन लाख रुपये किमतीचा टाटा टेम्पो आणि ९० पोती गुटका असा एकूण ७ लाख ९२ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पळून गेलेला वाहन चालक इकबाल नदाफ, सहचालक मोहम्मद आरिफ मोहम्मद युसूफ बागवान, अस्लम तांबोळी आणि वाहन मालक समीर सुतार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget