फॅबटेक पब्लिक स्कूलला मिळाली सीबीएसई बोर्डाची संलग्नतेची मान्यता

 


 

सोलापूर // प्रतिनिधी 

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सेन्ट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन-सीबीएसई) यांच्या दिनांक १ मार्च २०२१ रोजी मिळालेल्या पत्रानुसार फॅबटेक पब्लिक स्कूलला  सीबीएसई बोर्डाची संलग्नतेची मान्यता मिळाली असल्याची माहिती फॅबटेक पब्लिक स्कूलच्या प्राचार्या शिल्पा कोळेकर यांनी दिली आहे.

  सदरची मान्यता ही सीबीएसईने गठीत केलेल्या सदस्यांच्या टीमने दिनांक ६ फेब्रुवारी रोजी सीबीएसईच्या नियमानुसार शाळेचे सुसज्य कॅम्पस, इन्फ्रास्ट्रक्चर, खेळाचे मैदान, सर्व क्लास रूम्स, सर्व लॅब, लायब्ररी, शिकविणारा स्टाफ, विद्यार्थ्यांची गुणवत्ता या सर्व बाबींची तपासणी करण्यात आली होती.  नुकत्याच दिनांक १ मार्च २०२१ रोजी मिळालेल्या पत्रानुसार फॅबटेक पब्लिक स्कूलमध्ये इ.१ ली ते १० वी पर्यंतच्या वर्गांना सीबीएसई बोर्डाची मान्यता मिळाली असून याचा संलग्नीकरण न. ११३११०५ असा आहे.  याच पब्लिक स्कूलमध्ये नर्सरी, ज्युनिअर व सिनियर केजी असे पूर्व प्राथमिक  वर्गसुद्धा चांगल्या विद्यार्थी संख्येने सुरु आहेत.

   यावेळी बोलताना संस्थेचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर मा. श्री. भाऊसाहेब रुपनर म्हणाले कि, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सेन्ट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन-सीबीएसई) ही भारत सरकारची माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाची सोय करणारी सरकारी संस्था आहे. शाळा म्हणजे जीवनाला दिशा देणारा मार्ग.  हे दिशा दर्शनाचे काम करतात शाळेतील शिक्षक. शाळेतच पाय चुकला तर मुलाच्या आयुष्याची इमारत डळमळीत होते. म्हणूनच शाळा या ज्ञान मंदिराकडे पालकांचा बघण्याचा दृष्टीकोन हा भविष्यकालीन असला पाहिजे.सध्याच्या घडीला जागतिक दर्जाचे शिक्षण विद्यार्थ्यांना भेटायला हवे म्हणूनच  सीबीएसई पॅटर्न असलेली  फॅबटेक पब्लिक स्कूलची स्थापना स्वर्गीय बिरासाहेब रुपनर यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०१६ मध्ये केली होती. आज या फॅबटेक पब्लिक स्कूलला  केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने संलग्नतेची मान्यता दिली आहे. हि संपूर्ण सांगोलावासीय व परिसरातील विद्यार्थी व पालकांसाठी आंनदाची बाब आहे. 

   मा. श्री. भाऊसाहेब रुपनर यांनी सर्व शिक्षक व शिक्षकेइत्तर कर्मचारी यांचे अभिनंदन केले. यावेळी संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे, प्राचार्या शिल्पा कोळेकर  सर्व शिक्षक व शिक्षकेइत्तर कर्मचारी उपस्थित होते.


Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget