बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी माढा तहसील कार्यालयावर मोर्चा!




सोलापूर // प्रतिनिधी 

बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीने केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात माढा तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये संस्थापक अध्यक्ष सुनील ओहोळ म्हणाले की ,देशामध्ये व महाराष्ट्रामध्ये एससी एसटी वर खूप मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार वाढला असून पोलीस स्टेशनला न्याय मागण्यासाठी गेल्यानंतर एस सी एसटीच्या लोकांवर 395 427 सारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले जातात. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो अहवालानुसार ॲट्रॉसिटी कायदा प्रमाणे नोंदविलेल्या गुन्ह्यात पन्नास टक्क्यांहून कमी प्रमाणात आरोपपत्र दाखल होतात, त्यापैकी 10 ते 20 टक्के प्रकरणाची चौकशी होती ,3.3 टक्के खटले न्यायालयात उभे राहतात,  फक्त एक टक्‍क्‍यांहून कमी आरोपींना शिक्षा दिली जाते. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी कागदावरच राहिली आहे. त्यामुळे या कायद्याचा उपयोग झाला नसून, दुरुपयोग होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, ओबीसीची जातिनिहाय जनगणना न करणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध करून घरगुती व शेतकऱ्यांचे वीज बिल माफ न करणाऱ्या महाराष्ट्र शासनाचा ही जाहीर निषेध करण्यात आला, पेट्रोल डिझेलचे दर वाढले जात आहेत, निवडणुकीसाठी वापरली जाणारी ईव्हीएम मशीन तात्काळ बंद करावी, असेही ते म्हणाले महेंद्र लंकेश्वर ,नारायण गायकवाड, रवी सरवदे प्रदीप परकाळे, यांनी शासन जातीवादी असून सर्वसामान्यांना न्याय मिळत नाही, असे मनोगत व्यक्त केले. 



यावेळी सुधीर लंकेश्वर, गणेश मोरे, गणेश देवकते, विकास जावळे, रफिक शेख, बापूसाहेब लोंढे, बाबा घनवजीर, अनिल पवार ,रोहित ढावरे ,अमर कदम, संग्राम पाटोळे, बापूसाहेब शिंदे ,नितीन गायकवाड, बापू माने ,प्रदीप सरवदे ,आनंद जाधव, कुमार डांगे, दीपक लोंढे ,शरद लंकेश्वर, आप्पा थोरात, वसंत ताकतोडे, अनिल सरवदे, कांचन कांबळे, रामभाऊ कांबळे, बाळासाहेब झेंडे, सतीश वाघमारे, अप्पासाहेब ओहोळ, अमित ओहळ, उल्हास खरे ,प्रताप रणदिवे, बाळासाहेब बनसोडे, रामभाऊ लोंढे असे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget