सुप्रसिद्ध अभिनेते आमिर खान कोरोना पॉझिटिव्ह.




वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानला कोरोनाची लागण झाली आहे. आमिर खानच्या टीमने ही माहिती दिली आहे. सध्या आमिर खानने स्वत:ला होम क्वॉरंटाईन केलं आहे.

"आमिर खानची कोविड -19 टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तो सध्या आपल्या घरी होम-क्वॉरंटाईनमध्ये आहे आणि सर्व नियमांचे पालन करत आहे. आमीरची तब्बेत ठीक आहे. नुकतेच आमीरच्या संपर्कात जे आले असतील त्यांनी खबरदारी म्हणून त्यांची कोविड 19 चाचणी करून घ्यावी. आपल्या चिंता आणि शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांचे आभार."


गेल्यावर्षी आमिरच्या घरातील सात कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते.


या सात कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षारक्षक, ड्रायव्हर, घरात काम करणारे नोकर यांचा समावेश होता. काही दिवसांपूर्वीच रणबीर कपूर, संजय लीला भन्साळी, कार्तिक आर्यन, वरुण धवन, नीतू सिंह यांसारख्या बॉलिवूड सेलिब्रिटींनाही कोरोनाची लागण झाली होती.


आमिर खानने 14 मार्च रोजी आपला 56 वा वाढदिवस साजरा केल्या. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी आमिरने सोशल मीडिया सोडण्याची घोषणा केली होती. अलीकडेच तो 'कोई जाने ना' चित्रपटाच्या 'हर फन मौला' या गाण्यात दिसला. या गाण्यात तो अली अवरामसोबत डान्स करताना दिसला होता.


याशिवाय आमिर खान आगामी 'लाल सिंह चड्ढा' चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 24 डिसेंबर 2021 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट गेल्या वर्षी ख्रिसमस येथे प्रदर्शित होणार होता पण कोरोना साथीमुळे ती तारीख पुढे ढकलली गेली.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget