वंचित बहूजन आघाडीच्या पंढरपुर तालुकाध्यक्षपदी विनोद तोरणे तर उपाध्यक्षपदी संजय सोनटक्के यांचीनिवड!

 



प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचे सर्वांनी मानले आभार!



दिनदलित गोरगरीब सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी वंचित बहूजन आघाडीच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील तालूका निहाय कार्यकारणी जाहीर करण्यात असुन पंढरपुर तालूक्याच्या अध्यक्षपदी विनोद तोरणे यांची तर उपाध्यक्षपदी संजय सोनटक्के,अंकुश शेंबडे उपाध्यक्ष, तानाजी वाघमारे उपाध्यक्ष, अविनाश शिंदे उपाध्यक्ष, सचिन सोनवणे महासचिव, गायकवाड गणेश महासचिव, सिध्दू बाबु प्रक्षाळे सचिव, संतोष कांबळे,  कोषाध्यक्ष, रघुनाथ वाघमारे संघटक, हर्षल जाधव संघटक, युवराज इंगळे संघटक यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.या सर्व नवनिर्वाचित पदाधिका-यांनी वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचे मनापासून आभार मानले आहेत.




 प्रत्येक समाज घटकातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या 

वंचित बहूजन आघाडी ब-याच वर्षापासून दिनदलित गोरगरीब सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी अहोरात्रपणे कार्यरत आहे तरी या पक्षाला अधिक बळकट करण्यासाठी दिनांक 1 मार्च 2021 रोजी नव्याने सोलापुर जिल्ह्यातील तालूका निहाय पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत 

यामध्ये वंचित बहुजन आघाडी च्या वतीने सर्व समाजातील प्रत्येक जाती-धर्माला न्याय देण्याचा प्रयत्न श्रद्धेय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी यावेळी केला आहे यामध्ये पंढरपूर तालुक्यातुन नवतरुण व धाडसी असे नेतृत्व करणारे विनोद तोरणे यांची निवड केल्यामुळे पक्ष्याला चांगली बळकटी मिळणार आहे याच बरोबर पक्षाचे विचार सर्व तळागाळातील लोकांना माहिती व्हावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी नूतन तालुकाध्यक्ष विनोद तोरणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

आणि अशाच प्रकारे सर्व समाजघटकातील गोरगरीब जनतेच्या न्याय हक्कासाठी कार्य करीत राहतील असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केला.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget