सहाय्यक कामगार आयुक्तांना निलंबित करा.कामगार सेनेचे ५ मार्च रोजी धरणे आंदोलन




सोलापूर // प्रतिनिधी 

सोलापूर सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयातील स्वत : सहाय्यक कामगार आयुक्त व वरीष्ठ कर्मचारी संगनमताने बोगस बांधकाम कामगारांची नोंदणीकरून शासनाचे कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे . यामुळे त्यांना ताबडतोब निलंबित करून चौकशी करावी , अशी मागणी महाराष्ट्र कामगार सेनेच्यावतीने कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांनी केली परंतु याबाबत अद्यापी कोणतीही कारवाई किंवा चोकशी झालेली नाही . म्हणून वरील मागणीसाठी महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने दि . ०५/०३/२०२१ शुक्रवार रोजी मा . जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे . अशी माहिती विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांनी दिली आहे .

            केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांसाठी सुरू करण्यात आलेल्या बांधकाम कामगार कल्याण योजना जाहिर केले त्याचा फायदा घेण्यासाठी बांधकाम कामगारांची सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात नोंदणी करणे अनिवार्य आहे . त्यामुळे सहाय्यक कामगार आयुक्त श्री . निलेश यलगुंडे व त्यांच्या कार्यालयीन संबंधीत योजनेचे प्रमुख सौ . देऊळकर मॅडम यांनी खाजगी दलालांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणात बोगस कामगारांची नोंदणी करून कोट्यावधी रुपयांची भ्रष्टाचार केला आहे . याबाबत महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने व सोलापुरातील इतर कामगार संघटनांनी वरील बोगस बांधकाम कामगारांची नोंदणीची चौकशी करून  श्री . निलेश यलगुंडे व संबंधीत अधिकारीयांचे निलंबित करण्याची मागणी केली . परंतु प्रशासनांनी कुठलेही दखल घेत नसल्याने महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने ५ मार्च २०२१ शुक्रवार रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय ( पुनम गेट ) समोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे . या धरणे आंदोलनात सर्व बांधकाम कामगार ( महारान ) यांनी केली आहे . बंधु - भगिनी उपस्थित रहावे , असे आव्हान महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी केली आहे

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget