विश्व वारकरी सेनेतर्फे बीड जिल्ह्यातील माथेफिरू वृत्तीच्या शरद तांदळे विरोधात पोलिसात तक्रार दाखल; व सर्वत्र जाहीर निषेध




वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

वारकरी संप्रदाय व महाराष्ट्रातील साधू-संत यांविषयी असभ्य शब्दात बोलल्या बद्दल बीड जिल्ह्यातील माथेफिरू वृत्तीच्या शरद तांदळे विरोधात विश्व वारकरी सेनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. गणेश महाराज शेटे यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करून सर्वत्र जाहीर निषेध केला आहे.


वारकरी संप्रदायाचा भजन, कीर्तन, हरिपाठ या विषयातील तिळमात्रही अभ्यास नसताना. शरद तांदळे हा महाराष्ट्रातील संतांविषयी असभ्य शब्दात बोलल्याबद्दल विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष ह. भ. प. गणेश महाराज शेटे यांनी पोलीस स्टेशनला रीतसर तक्रार दाखल केली असून त्यांच्यावर पोलीस प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी जेणेकरून भविष्यात कोणीही वारकरी संप्रदाय विषयी अथवा साधू-संत यांविषयी असते शब्दात बोलणार नाही. अशी विनंती पोलीस प्रशासनाला गणेश महाराज शेटे यांनी केली आहे. तसेच महाराष्ट्रातील सर्वच वारकरी संघटनांनी आप-आपल्या हद्दीतील पोलीस स्टेशनला शरद तांदळे विरोधात तक्रार दाखल करून निषेध करण्याचे आव्हान ह.भ.प. गणेश महाराज शेटे यांनी केले आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget