प्रांताधिकारी ढोले यांच्या दीर्घकाळ रजेमुळे कामकाज ठप्प




पंढरपूर // प्रतिनिधी 

पंढरपूरचे प्रांत अधिकारी सचिन ढोले आणि पंढरपूरकर एक वेगळीच नाळ जोडली गेल्याचे मागील काही वर्षे पहावयास मिळाले आहे. त्यांच्या कामाची पद्धत अन जनतेचे समाधान यामुळे येथील जनतेला प्रांत कार्यालयात अजूनही तसेच काम व्हावे अशी अपेक्षा होत आहे. मागील महिनाभरापासून ढोले हे उपचारासाठी दीर्घकाळ रजेवर गेल्यामुळे येथील अनेक कामे ठप्प होऊन बसली आहेत.

     सध्या येथील प्रांताधिकारी म्हणून गजानन गुरव यांच्याकडे पदभार सोपविला आहे, परंतु या ठिकाणी विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाल्यामुळे पूर्णवेळ गुरवसाहेब यांना काम पाहावे लागत आहे. त्यामुळे इतर कामकाजासाठी लोकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या त्या बेटाइम काम करण्याच्या पद्धतीची आठवण होऊ लागली आहे.

  ढोले हे कार्यालयीन वेळ बाजूला ठेवून कधीही पाहावे काम अन कामच यातच कायम असायचे , कोणत्याही शासकीय विभागाचे काम असले तरी  कोणीही मेसेज केला तरी त्या कामाची दखल घेणारा अधिकारी म्हणून नावलौकिक मिळविले आहे. अशा या चांगले काम करणाऱ्या प्रांत अधिकारी यांनी जी दीर्घ रजा घेतली आहे त्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत.

     मागील काही महिन्यांपासून रस्त्यासाठी संपादित झालेल्या जमिनीचा मोबदला देण्याचे काम रात्रंदिवस सुरू होते, परंतु ढोले यांची दीर्घ रजा यामुळे याकामीही मोठी अडचण होऊन बसली आहे. त्यामुळे ढोले यांचे आरोग्य लवकरच बरे होऊन त्यांनी पदभार स्वीकारावा अशी जनतेतून मागणी होऊ लागली आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget