पंढरपूर // प्रतिनिधी
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघासाठी यशवंत सेनेकडून उमेदवारी जाहीर झालेले नवतरुण धाडसी नेतृत्व संजय नागनाथ माने यांनी आज मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये आज एका गोरगरीब मेंढपाळास मारहाण झाली होती. पण जागेवरच त्या मेंढपाळास न्याय मिळवून देण्याची महत्त्वपूर्ण भूमिका संजय माने यांनी आज बजावली. कोणत्याही पोलीस स्टेशन व कोणत्याही पुढाऱ्यांकडे न जाता जागेवर त्या गोरगरीब मेंढपाळास न्याय देऊन महत्वपूर्ण भूमिका त्यांनी बजावली आहे. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर संजय माने यांनी सामाजिक बांधिलकी जपत सर्व गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
त्याचबरोबर त्यांनी तातडीने ज्या गोरगरीब मेंढपाळास ज्यांनी मारहाण केली आहे. त्यांच्याकडून उपचार करून त्या सर्व मेंढपाळास आर्थिक मदतही केली त्याच बरोबर नवीन मोबाईल हँडसेट घेऊन देऊन त्यांची रीतसर त्यांच्या गावी रवानगी करण्यात आली.
या सर्व घडामोडी एवढ्या जलद घडल्या की त्या सर्व गोरगरीब व कष्टकरी मेंढी पालन करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील यावेळी संजय माने यांनी केलेल्या मदतीबाबत आपल्या भावना थांबवता आले नाहीत त्याचबरोबर त्यांनी सर्व उपस्थित मेंढपाळ तरुणांना योग्य रीतीने मार्गदर्शन केले.
अशा घटना पंढरपूर मंगळवेढा व इतर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात इथून पुढे घडू नयेत यासाठी श्री संजय नागनाथ माने यांनी महा विकास आघाडी ला एक नम्र आवाहन केले आहे की त्यांनी सर्व धनगर समाजातील मेंढपाळांना सुरक्षा प्रदान करावी त्याचप्रमाणे परवानायुक्त पिस्तूल त्यांच्याकडे देण्यात यावे व या सर्व गोरगरीब धनगरी मेंढपाळांचा योग्य रीतीने सर्वच महाविकास आघाडीच्या सर्व नेतेमंडळींनी विचार करावा अशी मागणी यावेळी संजय माने यांनी सर्वांसमोर केली.
या सर्व मेंढपाळांना मदत करते वेळी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे यशवंत सेनेचे उमेदवार संजय नागनाथ माने, राज्य संघटक राजेंद्र कुमार बुध्दाळ सर,एक छंद गोपीचंद युवा मंच राज्य संघटक,संजय नागनाथ माने, नगरसेवक प्रशांत यादव, गजानन चौगुले, चेतन हाके, विजय रेवे, सिद्धनाथ सलगर, धनाजी गडदे, चन्नाप्पा मरईवाले, त्याचबरोबर मंगळवेढा नगरपालिकेचे नगरसेवक प्रशांत यादव यांनी महत्त्वाची भूमिका चांगल्या पद्धतीने सहकार्य केले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.