संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील सरपंचांचे सर्व प्रश्न प्राधान्याने सोडवू:-नितीन काळे




पंढरपूर // प्रतिनिधी 

पंढरपूर तालुक्यातील तावशी येथील होतकरू तरुण समाजसेवक महाराष्ट्र राज्य शिव सरपंच सेवा संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष नितीन काळे यांनी पंढरपूर येथे समस्त पश्चिम महाराष्ट्रातील व सोलापूर जिल्ह्यातील सरपंचांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपले संपर्क कार्यालय सुरू केले असून हे संपर्क कार्यालय पंढरपूर येथील स्टेशन रोड वरती कार्यान्वित करण्यात आले आहे.

शिव सरपंच हि सर्व महाराष्ट्रातील सरपंचाचे प्रामुख्याने प्रश्न सोडवण्यासाठी व ग्रामपंचायतीचे कामकाज कशा पद्धतीने चालते यासाठी परिचित असून या संघटनेने आजपर्यंत अनेक मूलभूत प्रश्न प्राधान्याने सोडवले आहेत. महाराष्ट्र राज्य शिव सरपंच सेवा संघटना म्हणजे सर्व महाराष्ट्रातील सरपंचानसाठी एक मुक्त व्यासपीठ आहे. अशी माहिती शिव सरपंच सेवा संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष नितीन काळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना माहिती दिली त्यांनी समाजसेवेचे व्रत अंगिकारले असून नितीन काळे यांचे संपर्क कार्यालय म्हणजे सर्व सोलापूर जिल्ह्यातील सरपंचाचे प्रश्न सोडवण्याचे मुख्य ठिकाण आहे.


या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून आपण संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील सरपंचाचे विविध प्रश्न शिव सरपंच सेवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. लक्ष्मणरावजी सरवदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्राधान्याने सोडवू असे यावेळी नितीन काळे यांनी सांगितले.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget