अकोला शहरात मध्यवर्ती ठिकाणी वारकरी भवन द्या आणि पूर्णा नदीकाठावर राक्षा विसर्जन कुंडाचे निर्माण करा

 



विश्व वारकरी सेनेच्या वतीने आमदार अमोल दादा मिटकरी व ऊप जिल्हा अधीकारी प्राध्यापक श्री संजय खडसे साहेब यांना निवेदन देण्यात आले


वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

अकोला शहर व परिसरातील गावांमध्ये सतत कथा वाचन ,सप्ता,भागवत तसेच   किर्तनांचे कार्यक्रम सुरू असतात या कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी तसेच कार्यक्रम आटोपून परत जाण्यासाठी उशीर झाला तर ह भ प महाराजांची निवासासाठी कुचंबणा होते तसेच अकोला शहरात विविध स्पेशालिस्ट दवाखाने असल्याने ह भ प  महाराज आणि वारकऱ्यांचे  निवासाची व्यवस्था व्हावी यासाठी अकोला शहरात मध्यवर्ती ठिकाणी जिल्ह्यातून येणाऱ्या गोर गरिबांच्या पेशंट सोबत येणाऱ्या व्यक्तींच्या निवास व्यवस्थे करिता सर्वधर्मीय वारकरी भवन निर्माण करावे या मागणीचे निवेदन आज विश्व वारकरी सेनेच्या वतीने आमदार अमोल दादा मिटकरी व उपजिल्हाधिकारी प्राध्यापक श्री संजय भाऊ साहेब यांनि दिले आहे 

पंढरपूर आणि इतर धार्मिक स्थळीं वारकऱ्यांना राहण्यासाठी मठांची आणि विविध संस्थानद्वारे  निवास व्यवस्था केलेली आहे अकोल्यात मात्र  तशी व्यवस्था नाही त्यामुळे अकोल्यात वारकऱ्यांच्या सोयीसाठी वारकरी भवन निर्माण करण्यात यावी अश्या  मागणीचे निवेदन देण्यात आले तसेच सोबतच अकोला जिल्ह्याचे वैभव असलेली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची तारणहार असलेली पूर्णा नदी ही संपूर्ण जिल्ह्यातील जनतेची श्रध्दास्थान आहे त्या नदीला  मात्र जनतेकडून सतत दूषित करण्याचे काम सुरू असते  जिल्ह्यातील लोकांच्या मृत्यूनंतर रक्षा विसर्जन करण्यासाठी पूर्णा मातेचीच निवड केली जाते त्यामुळे नदीतील पाणी  दूषित होत असते तेच पाणी तीर्थ म्हणून लोक मोठ्या श्रद्धेने पित असतात . हा प्रकार थांबावा म्हणून  पूर्णा नदी काठावर एक राक्षा विसर्जन कुंडाचे बांधकाम करावे व पूर्णामाय दूषित होण्यापासून वाचवावी अशीही मागणी विश्व वारकरी सेनेने दुसऱ्या एका निवेदनात  केली आहे यावेळी विश्व वारकरी सेनेचे  राज्यअध्यक्ष हभप गणेश महाराज शेटे यांचे समवेत विठ्ठल महाराज साबळे,रामरतन महाराज वसू,गजानन महाराज येरोकर,विलास म कराड ,रविंद्र म केंद्रे, उध्दव म  कुलट,रामकृष्ण म  आंबूस्कार,श्रीधर म  पातोंड, श्रीधर म  तळोकार,ज्ञानेश्वर महाराज जावरकर,  आदींची उपस्थिती होती   या महाराज मंडळींनी आमदार अमोल मिटकरी यांची भेट घेऊन निवेदन सादर करून  समस्या मार्गी लावण्याची विनंती केली असता आमदार अमोल दादा मिटकरी यांनी सांगितले की वारकऱ्यांचा आदेश हा मला शिरसावंद्य आहे आणि वारकऱ्यांच्या समोर मी खोटं बोलणार नाही मी प्रशासनासोबत  चर्चा करून प्रश्न मार्गी लावेल  व आमदार अमोल दादा मिटकरी यांनी उपस्थित सर्व कीर्तनकार मंडळींचा शाल श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सत्कार केला.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget