सोलापूर // प्रतिनिधी
मोदी सरकारने कोरोना काळात अतिशय घाईगड़बडीत कोणाशीही चर्चा न करता शेतकरी विरोधी तीन कृषी काळे कायदे पारीत केले याच्या विरोधात, आणि कृषी विधेयके रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीमध्ये गेल्या तीन महिन्यापासुन शेतकरी आंदोलन करत आहेत. तीन महीने एवढा दीर्घकाळ आंदोलन सुरु असताना मोदी सरकार शेतकऱ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत असुन आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न मोदी सरकार करत आहे. शेतकरी आंदोलन आणि त्यांच्या मागण्याविषयी जनजागृती करुण दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिम्बा देण्यासाठी चिकमंगळुर युवक काँग्रेसचे पदाधिकारी T.S. विश्वनाथ व शिवसागर तेजस्वी हे चिकमंगळुर (कर्नाटक ) ते दिल्ली असा दुचाकी प्रवास करुण वाटेत येणाऱ्या प्रत्येक शहर जिल्ह्यातील शेतकरी, नागरिक आणि काँग्रेस पदाधिकारी यांची भेट घेऊन शेतकरी आंदोलनाविषयी जनजागृती करणार आहेत आणि दिल्ली येथे पोहोचुन शेतकरी आंदोलकांची भेट घेउन काँग्रेस पक्षाच्या वतीने पाठिम्बा देणार आहेत.
आज रोजी सोलापूर शहरात त्यांचे आगमन झाले असता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष, आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने T. S. विश्वनाथ व शिवसागर तेजस्वी यांचे स्वागत सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या हस्ते महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस विनोद भोसले, अनुसूचित जाती जिल्हा अध्यक्ष गौरव खरात, NSUI जिल्हा अध्यक्ष गणेश डोंगरे, दक्षिण सोलापूर विधानसभा अध्यक्ष सैफन शेख, उत्तर विधानसभा अध्यक्ष विवेक कन्ना, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, भटक्या विमुक्त अध्यक्ष भारत जाधव, संजय गायकवाड़, शाहु सलगर, आरिफ पठाण, पवन गायकवाड़, सौरभ सालुंखे, चंद्रकांत नाईक, अजय जाधव, सचिन गायकवाड़ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.