पंढरपूरात शिवलीलामृत पारायण सोहळा संपन्न




पंढरपूर // प्रतिनिधी

पंढरपूर शहरातील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या मंदिरासमोर दरवर्षीप्रमाणे यंदाही कोरोना च्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेले सर्व नियम पाळत दासबोध व शिवलिलांमृत पारायण सोहळा साजरा करण्यात आला.

शहरातील मंदिर परिसरात असलेला पाण्याचा थोरला हौद या ठिकाणी श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे मंदिर आहे. श्रीब्रह्मचैतन्य प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही श्री समर्थ रामदास नवमी च्या निमित्ताने दासबोध पारायण व महाशिवरात्रीनिमित्त शिवलीलामृत पारायण सोहळा संपन्न झाला. यावेळी कोरोना च्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंग चे पालन करत हे पारायण करण्यात आले. सदरचा पारायण सोहळा संत कवी श्रीधर स्वामी नाझरकर यांचे वंशज वैकुंठवाशी शा स श्री पांडुरंग नारायण शास्त्री नाझरकर यांच्या अधिपत्याखाली यशस्वीपणे सोहळा संपन्न झाला. दरवर्षी होणाऱ्या या पारायणा मध्ये कोणत्याही प्रकारचे खंड पडू नये यासाठी सोशल डिस्टंसिंगचा वापर करत ठराविक जणांनी या सोहळ्यात भाग घेऊन हा सोहळा पार पाडला.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget