सोलापूर // प्रतिनिधी
फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित फॅबटेक पब्लिक स्कूल सांगोला येथे मराठी प्रसिद्ध कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस म्हणजेच " मराठी राजभाषा दिन" विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन असेम्ब्ली मध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कुसुमाग्रज यांच्या स्मृतीस वंदन करून राजभाषा दिनाची व कुसुमाग्रज यांची सविस्तर माहिती इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनी अनुष्का केदार हिने अतिशय सुंदररित्या विद्यार्थ्यांना सांगितली. त्यानंतर शौर्य लिगाडे या विद्यार्थ्याने कुसुमाग्रज यांची प्रसिद्ध कविता ' कणा ' खूप प्रभावीपणे विद्यार्थ्यांसमोर सादर केली व सर्वात शेवटी अन्वी कांबळे या विद्यार्थिनीने आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता पाचवीतील विद्यार्थी अजय पवार याने या दिवसाचे औचित्य साधून उत्कृष्टरित्या मराठी मधून केले. या कार्यक्रमाचे आयोजन असेम्ब्ली मध्ये इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी केले व त्यांना मार्गदर्शन इयत्ता पाचवीच्या वर्गशिक्षिका व मराठी विषय शिक्षिका शितल बिडवे व विद्या मॅडम यांनी केले.या दिवसाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी या दिवशी प्रत्येक विद्यार्थ्यांनी अवांतर वाचन करण्याचा उपक्रम विद्यार्थ्यांना देण्यात आला. वाचनाची सवय विद्यार्थ्यांमध्ये विकसित व्हावी हा त्या पाठीमागचा हेतू होता. मराठी राज्यभाषा दिनानिमित्त मराठी विभागातर्फे विविध कवी ,लेखक ,साहित्यकार, त्यांच्या कविता, चित्रे लावून मराठी विभाग बोर्ड विषय शिक्षकांकडून सजविण्यात आला. या कार्यक्रमासाठी शाळेच्या प्राचार्या शिल्पा कोळेकर यांचे मार्गदर्शन लाभले. तर सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.