वृत्तसंस्था // प्रतिनिधी
बेळगाव महापालिके समोर अनधिकृत रित्या लावण्यात आलेला लाल पिवळा ध्वज हटवण्यात यावा यासाठी शिवसेना कोल्हापूर जिल्हा व बेळगाव जिल्हा यांचे वतीने आंदोलन सुरू आहे
याला विरोध म्हणून बेळगाव मधील काही शंड कार्यकर्त्यांनी बेळगाव शिवसेना जिल्हा प्रमुख यांच्या गाडीवरील शिवसेनेच्या पाटीला काळे फासण्याचा प्रयत्न केला , म्हणून
याचा निषेध म्हणून कोल्हापूर जिल्हा युवसेनेच्या वतीने आज कर्नाटकातील बसेस वर जय महाराष्ट्र असे भगव्या रंगात लिहून कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांना इशारा देण्यात आला की पुन्हा असे काही केले तर जशास तसे उत्तर देण्यात येईल,
आंदोलन युवासेना विस्तारक डॉ. सतिशजी नरसिंग* यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले,
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख संदीप पाटील, युवासेना जिल्हा समन्वयक दिनेश कुंभिरकर, युवासेना उपजिल्हा प्रमुख प्रतीक क्षीरसागर, सुधीर सुपल, अनिकेत पाटील,सुहास देसाई,शरद चौगुले,सागर हेबाले, सागर भुसारी, काशीनाथ गडकरी व युवसैनिक उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.