पूजा चव्हाण प्रकरणाला नवं वळण, वडिलांची चुलत आजीविरोधात तक्रार




वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाला नवं वळण लागलं आहे. पूजाचे वडील लहूदास चव्हाण यांनी शांताबाई राठोड यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. परळी शहर पोलिसात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. पाच कोटी घेतल्याचा आरोप करून बदनामी केल्याचा तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे.


संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी पूजा चव्हाणच्या आई-वडिलांना पाच कोटी रुपये दिले आहेत. त्यामुळे ते काही बोलणार नाहीत. असा आरोप पूजाची चुलत आजी शांता राठोड (Shanta Rathod) यांनी केला होता. पूजाचे वडील लहूदास चव्हाण (Lahu Chavan) यांनी तर असं देखील म्हटलं की, शांताबाई या आमच्या नातेवाईक नाहीत.


आजही विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणाचा मुद्दा चर्चेत राहिला. पूजा चव्हाण मृत्यू प्रकऱणी सर्व पुरावे हाती असतानाही आणि या प्रकरणाला 20 दिवस उलटूनही  अजून एफआयआर का दाखल झाली नाही, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला आहे. 12 ऑडिओ क्ल्पिमध्ये थेट पुरावे असूनही पोलीस का काम करत नाही असा सवालही त्यांनी यावेळी सभागृहासमोर उपस्थित केला.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget