सोलापूर // प्रतिनिधी
सोलापूर सहाय्यक कामगार आयुक्तकार्यालयातील सहाय्यक कामगार आयुक्त श्री . निलेश यलगुंडे व त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी व त्यांनी नेमलेल्या दलालांना संगनमत करून बोगस बांधकाम कामगारांची नोंदणी मोठ्या प्रमाणात करून शासनाचे कोट्यावधी रुपयांचे भ्रष्टाचार केला आहे . म्हणून नोंदणी झालेल्या कामगारांची व टेकेदारांची यादी माहितीचा अधिकार २००५ अंतरगत मागणी विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांनी केली असता सदर माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत . असा आरोप महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे .
सोलापूर सहाय्यक कामगार आयुक्तकार्यालयामार्फत मोठ्या प्रमाणात बोगस बांधकाम कामगारांची नोंदणीकरून शासनाचे रक्कम भष्टाचार केला त्याच बरोबर बांधकाम कामगारांकडून एका कामगारा मागे दोन ते तीन हजार रुपये घेतल्याचे अनेक तक्रारी आलेले आहेत तर महाराष्ट्र कामगार सेनासह इतरकामगार संघटनाही बोगस बांधकाम कामगार नोंदणीकरणाऱ्या सहाय्यक कामगार आयुक्त व त्यांच्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांना निलंबित करा अशी मागणी केली आहे . विशेष म्हणजे जिल्हाधिकारी साहेबांनी बोलाविलेल्या एकाही बैठकीत श्री.यलगुंडे किंवा त्यांचे प्रतिनिधी हजर राहत नाहीत . म्हणून बोगस बांधकाम कामगारांची माहिती उगड करण्यासाठी महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांनी केंद्रीय माहितीचा अधिकार २००५ अंतर्गत योजना सुरू झाल्यापासून आजपर्यंत नोंदणी केलेल्या कामगारांची व ठेकेदारांची यादीची माहिती मागितले तर सदर माहिती देण्यास सहाय्यक कामगार आयुक्तकार्यालयाकडून टाळाटाळ करीत आहेत . या संदर्भी वेळकाढूपणाचा कृत्य करीत आहेत . म्हणून महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने लवकरच तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा कारमपुरी ( महाराज ) यांनी दिला आहे .
सोलापूरातील सर्व कामगार संघटना , कामगार ज्यांची सहाय्यक कामगार आयुक्तालया विरोधात किंवा बांधकाम कामगार नोंदणी कामकाजा विरोधात तक्रार असल्यास महाराष्ट्र कामगार सेना कार्यालय ( पद्मशाली चौक ) येथील कार्यालयात संपर्क साधावे असे आवाहन विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांनी केले आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.