विश्व वारकरी सेनेच्या वतीने मा. देवेंद्र फडणवीस साहेबांचे आभार




वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या संतभूमी मध्ये महाराष्ट्र सरकारने कोरोना संकटाचे नाव पुढे करून धार्मिक कार्यक्रमावर बंदी घातलेली आहे यामागे पूर्ण एक वर्ष महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे बंद असून धार्मिक कार्यक्रमाला ही बंदी होती गेल्या दोन महिन्यापासून कथा कीर्तन चालू झाले होते पण कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे असे सांगून महाराष्ट्र सरकारने पुन्हा धार्मिक कार्यक्रमावर बंदी आणलेली आहे याकरिता विश्व वारकरी सेना व इतरही सर्व वारकरी संघटनांनी आपापल्या परीने महाराष्ट्र सरकारला जाग येण्याकरिता आंदोलन केले पण सरकारला जणू काही वारकऱ्यांची एलर्जी आहे की काय असं वाटायला लागले पण अधिवेशनामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सरकारला आज वारकरी संप्रदाय विषई जाग आणून दिली आणि सांगितले वारकरी संप्रदाय हा विश्व धर्म संप्रदाय आहे पण सरकार वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमावर बंदी घालत आहे धार्मिक कार्यक्रमतूनच कसा कोरोना वाढतो ,मंदिरातूनच कसा कोरणा वाढतो ,शिवजयंतीच्या वेळेस कसा कोरणा वाढतो, इतर राज्यांमध्ये धार्मिक स्थळा मधुनच  कोरोणा वाढत नाही व महाराष्ट्रातच असं का होतय हा जाब माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी विचारला आणि विशेष यावर्षी संत नामदेव महाराज यांची ७५० जयंती असतानासुद्धा शासकीय अभिवादन यादीतून नाव वगळण्यात आले ज्या नामदेव महाराजांनी वारकरी संप्रदायाची भगवी पताका पंजाब पर्यंत नेली त्या नामदेव महाराजांचे नाव यादीत न येणे ही फार खेदाची बाब आहे आणि म्हणून या दोन्ही विषयाला माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सरकार पर्यंत पोचवल्याबद्दल मी गणेश महाराज शेटे माझ्या विश्व वारकरी सेनेच्या वतीने जाहीर आभार मानतो व सरकारने जर त्वरित धार्मिक कार्यक्रमाला रीतसर परवानगी दिली नाही व संत नामदेव महाराजांचे नाव यादी मध्ये समाविष्ट केले नाही तर महाराष्ट्रातील सर्व वारकरी संघटना एकत्र येऊन भव्य स्वरुपाचे आंदोलन करणार याची महाराष्ट्र सरकारने दखल घ्यावी.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget