-प्रा.संग्रामदादा चव्हाण, जिल्हाध्यक्ष,सोलापूर जिल्हा किसान कॉंग्रेस.
अलीकडेच महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प जाहीर झाला असून हा अर्थसंकल्प नुसता शेतकऱ्यांविषयी आस्था व संवेदना जपणारा अर्थसंकल्प नसून शेतकऱ्यांच्या प्रगतीचा सरकारनं केलेला
महासंकल्प आहे. शेतकऱ्यांना सध्याचे महाविकास आघाडी सरकार हे खऱ्या अर्थाने "आपलं सरकार" वाटावं असाच कल्याणकारी अर्थसंकल्प महाविकास आघाडी सरकारने सादर केला आहे.या अर्थसंकल्प मधील कृषी क्षेत्रासाठी ज्या भरीव तरतुदी करण्यात आल्या त्या खरंच अत्यंत आवश्यक व अभ्यासपूर्ण अशा तरतुदी आहेत. एकूण लोकसंख्येच्या 70 % लोक शेतीवर अवलंबून असणाऱ्या भारतासारख्या कृषिप्रधान देशामध्ये दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या देशव्यापी अशा महाआंदोलनाला मोदी सरकारकडून अत्यंत
अनास्थेने आणि संवेदनाहीनतेने चिरडण्याच्या,बेदखल करण्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांविषयी मनापासून आस्था व संवेदनशिलता जपत ज्या भरीव तरतुदी केल्या आहेत त्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.देशामध्ये ज्या ज्या राज्यांमध्ये काँग्रेस सरकार आहे अशा राज्यांनी शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून राज्यकारभार करावा अशा मार्गदर्शक सूचना पक्षप्रमुख श्रीमती सोनिया गांधी, श्री.राहुल गांधी,महासचिव एच् के पाटील यांनी सर्व राज्यातील काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व इतर सर्वच पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत.काँग्रेस पक्षाच्या शेतकरीधार्जिन व संपुर्ण देशातील शेतकर्यांच्यासाठीच्या कल्याणकारी ध्येयधोरणाचा एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेसचे नूतन अध्यक्ष व अखिल भारतीय किसान कॉंग्रेसचे अध्यक्ष श्री.नानासाहेब पटोले यांनी पुढाकार घेऊन राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये विविध पातळीवर शेतकऱ्यांचे हित साधण्यासाठी अर्थसंकल्प समितीवर नैतिक दबाव ठेवत भरीव तरतुदींचा समावेश करुन घेतला. नैसर्गिक संकटांमुळे तसेच नोटबंदी व कोरोना संकटामुळे आलेल्या भयावह मंदीमुळे सध्या बळीराजा प्रचंड आर्थिक संकटातून जात असून केंद्रसरकारने ज्या प्रमाणे शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडून दिले आहे त्याप्रमाणे राज्यसरकारने शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडून देऊन चालणार नाही असे श्री.नानाभाऊ पटोले यांनी निक्षून सांगितले. शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे हे लॉकडाऊन कालावधीमध्ये सिद्ध झालेले आहे.लॉकडाऊन आणि नोटबंदीमुळे आलेल्या मंदीमध्ये इतर सर्व उद्योग क्षेत्रे कोलमडून पडली. मात्र एकट्या कृषी क्षेत्राने देशाचा जीडीपी सावरला व देशाची अर्थव्यवस्था कोसळू दिली नाही. लॉकडाऊन मध्ये लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या त्या लोकांच्या हाताला काम देण्याचे बहुमूल्य काम कृषी क्षेत्राने बजावलं.एकट्या कृषी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर व त्वरित रोजगार निर्मिती करण्याची क्षमता असल्याची बाब श्री. नानासाहेब पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच अर्थमंत्री अजित पवार व अर्थसंकल्पीय समितीच्या प्रभावीपणे निदर्शनास आणून दिल्या. कृषी क्षेत्रासाठी पाठपुरावा करुन नैतिक दबाव ठेवून अर्थसंकल्पामध्ये भरीव आर्थिक तरतूद करून घेण्याचे श्रेय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष तथा अखिल भारतीय किसान काँग्रेसचे अध्यक्ष व शेतकऱ्यांचे प्रश्न पोटतिडकीने तसेच प्रसंगी आक्रमकतेने मांडण्या मुळे शेतकऱ्यांच्या "गळ्यातले ताईत" बनलेले श्री. नानासाहेब पटोले यांना जाते.
अखिल भारतीय काँग्रेस पक्ष देशपातळीवर शेतकऱ्यांचे प्रश्न गांभीर्याने घेऊन त्यांची प्राधान्याने सोडवणूक करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असल्यामुळे महाराष्ट्रातील तमाम शेतकरी जनता काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहील.
शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने 3 लाखापर्यंत पिक कर्ज पुरवठा या तरतुदीमुळे वारंवार पिके फेल होऊन डोक्यावर कर्ज व व्याजाचा डोंगर होत असल्यामुळे शेतकऱ्याला निश्चित दिलासा मिळेल.एकीकडे केंद्रसरकारने कृषी विषयक कायद्याच्या माध्यमातून प्रचलित कृषी उत्पन्न बाजार समिती व्यवस्थेला सुरुंग लावण्याच्या पार्श्वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समिती बळकटीकरण करण्यासाठी 2 हजार कोटी रुपयांची तरतूद ही अत्यंत महत्त्वाची आहे. सर्व शेतकऱ्यांपर्यंत वीज कनेक्शन पोहोचावे म्हणून 1500 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून त्यामुळे शेतकरी सक्षम पणे शेती करू शकेल. तसेच थकीत वीज बिलामध्ये 66%एवढी वीजबीलमाफीसाठी एकूण 30 हजार 411 कोटी रक्कमेची तरतुद केल्याने या विजबिल माफी मुळे शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य बाजारपेठ व योग्य भाव मिळवून देण्यासाठी सुमारे 2 हजार 100 कोटी रुपये खर्चून बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प राबविण्याची संकल्पना अत्यंत फायदेशीर ठरेल. सुमारे 500 नवीन रोपवाटिका स्थापन करून ज्यादा उत्पादन देणाऱ्या नवीन जाती शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिका नर्सरी योजना दिशादर्शक ठरेल. कुकुट पालन शेड व कंपोस्टिंग यासाठी भरीव अनुदान योजना या सर्वच योजनांचा व तरतुदींचा शेतकऱ्यांना नव्याने उभे राहण्यासाठी निश्चित फायदा होईल असे प्रतिपादन प्रा.संग्राम चव्हाण यांनी यावेळी केले.
अखिल भारतीय किसान काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक श्री. प्रकाशराव घाले तसेच महाराष्ट्र राज्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष श्री. देवानंद पवार व पश्चिम महाराष्ट्र किसान काँग्रेसचे अध्यक्ष संदीप साठे या सर्वांनी अर्थसंकल्पातील कृषी क्षेत्रासाठी केलेल्या भरीव तरतूदींबद्दल महाराष्ट्र राज्यातील
महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले.
" शेतकऱ्यांच्या हितासाठी व मागासवर्गीयांच्या प्रश्नासाठी श्री.नानासाहेब पटोले यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर सडेतोड टीका करून भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला होता व काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता. श्री.नानासाहेब पटोले हे शेतकऱ्यांसाठी आवाज उठवणारा व हितासाठी झटणारा जणु एक"देवदूत"आहे. महाराष्ट्रातील सर्व शेतकरी व जनता श्री.नानाभाऊ पटोले व कॉंग्रेस पक्षाच्या मागे खंबीरपणे उभा राहतील* "
----- श्री.प्रकाशराव घाले राष्ट्रीय समन्वयक अखिल भारतीय किसान कांग्रेस



Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.