नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याला पडले तडे.

 



(मुरुमाची दबाई व्यवस्थित झाली नसल्याने ठिकठिकाणी रोड दबला रा. रा. प्राधिकरणाच्या अभियंत्यांचे दुर्लक्ष)


वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. पण या रस्त्याला उमरखेड शहरापासून ते मुडाणा पर्यंत जागोजागी मोठ-मोठे तडे गेले असल्याने संबंधित विभागाचे साफ दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. कामाचा दर्जा खालावला गेला असताना लोकप्रतिनिधी मात्र मुग गिळून गप्प बसले आहेत. 


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून कोट्यवधी रुपये खर्च करून भविष्यातील   वाहतुकीच्या दृष्टीने होत असलेल्या नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे गेल्या चार वर्षांपासून काम सुरू आहे. यामध्ये महागाव ते उमरखेड, बडशेवाळा हे अंदाजे ७५ किलोमीटर रस्त्याचे काम सद्भाव इंजिनिअरींग मुंबई ही कंपनी करत आहे. या अंतरराष्ट्रीय कंपनीची नोंदणी महाराष्ट्रात मुंबई येथे आणि मालक गुजरात राज्यातील अमदाबाद येथील आहे. तसेच या कंपनीचा मुख्य मालक विष्णुभाई पटेल हे सुमारे दोन वर्षांपूर्वी मरण पावले. त्या नंतर त्यांच्या वारसामध्ये झालेल्या वादामुळे ही कंपनी करारातील वेळेत काम पूर्ण करू शकली नाही. विविध राज्यांतील कामगार आणि अनेक छोट्या ठेकेदारांच्या माध्यमातून हे काम केले जात आहे. या राष्ट्रीय महामार्गासाठी प्रत्येक वाहनांची किमान वेगमर्यादा १०० किलोमीटर प्रतितास राखने अपेक्षित असल्याचे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे रस्त्याचा दर्जा सुध्दा तसाच राखणे अपेक्षित होते. वाहनांची गती प्रति तास शंभर किलोमीटर पेक्षा कमी करण्याची गरज पडू नये म्हणून अनेक ठिकाणी ओव्हर ब्रिज व बायपास हस्ते करण्यात आलेले आहेत. परंतु रोड दर्जेदार होत नसल्यामुळे ठिकाणी पृष्ठभाग उंच-सखल होत आहे. याबाबत रस्ते बनवण्याचे काम करणाऱ्या जाणकारांचे मत आहे की, ह्या रोडमध्ये मुरमाच्या भरावाचे काम दोन फुटांपासून ते सहा फुटापर्यंत आहे. आणि सदर भराव टाकताना प्रत्येक फुटावर दहा वेळा पाणी टाकून दहा वेळा पर्यंत दबाई करावयास पाहिजे. परंतु तसे न करता या कंपनीने नादंगव्हाणघाट फॉरेस्ट , कोठारी व गायरान जमिनीतील चोरीचा मुरूम वापरून रातोरात शेकडो मीटर काम पार पाडण्याचा सपाटा लावला होता. त्यामुळे मुरमाच्या दबाई कडे दुर्लक्ष करण्यात आले. या कामावर कधीही प्राधिकरणाचे अभियंता हजर असल्याचे दिसून आले नाहीत. त्यामुळे संपूर्ण काम कंपनीच्या बेभरवशावर झाल्याने पन्नास वर्षाची आयुर्मर्यादा व विस वर्षे देखभाल दुरुस्तीची जबाबदारी निर्मात्याकडेच असलेला हा रोड पूर्ण होण्यापूर्वीच दबल्या व उखडल्या जात आहे. अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. एक वेळ या तडे गेलेल्या ठिकाणी सिमेंट भरली तर नंतर दुसऱ्या बाजूने तडे पडत आहेत. त्यामुळे मोठ्या वाहनांना खूप कमी वेगात वाहन चालवावे लागत आहे. या कामाची संपूर्ण चौकशी व्हावी व उच्च दर्जाची तांत्रिक तपासणी व्हावी. नंतरच हा रस्ता वापरासाठी अधिकृतपणे खुला करावा अशी मागणी करण्यात येत आहे


 या बाबत कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक म्हणाले की तडे गेलेल्या ठिकाणी मलमपट्टी करण्याची तरतूद करारात करण्यात आली आहे. हे काम पुर्ण करण्यासाठी कामाचा दर्जा लक्षात न घेता बोगस काम करीत असल्याने भविष्याच्या दळणवळणाचे स्वप्न भंग ठरत असल्याने सर्व सामांन्याकडुन नाराजीचा सूर उमटत आहे.                              

उमरखेड येथील सद्भाव कॅम्पमध्ये मागील काही दिवसापुर्वी   चागंलीच हाणामारी चाली होती. कॅम्पमध्ये कोन्ही व्यवस्थापण करावयास धजावत नाही कारण तेथील व्यवस्थापणा व्यवस्थीत नसल्यामुळे वेळेवर पेमेन्ट होत नाही त्यामुळे लोखंडे, पांडे सहा महीन्यात व्यवस्थापक काम सोडुन राजेनामा देऊन गावी निघुण गेले यांचे मुळ कारण काय?

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget