सोलापूर // प्रतिनिधी
पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील राज्यमार्ग, जिल्हामार्ग, इतर जिल्हा मार्ग तसेच राज्य हद्द मधील
रस्त्यांची सुधारणा करणे, पुल बांधकामासाठी, रस्ते दुरूस्त करणे तसेच इतर कामासाठी आमदार प्रशांत
परिचारक यांनी अर्थसंकल्प अधिवेशन 2021-2022 मध्ये विधान परिषदेमध्ये अशोक चव्हाण,(सार्वजनिक बांधकाम मंत्री) यांचेकडे मागणी केली होती. त्याअनुषंगाने अशोक चव्हाण यांनी खालील
रस्त्यांच्या कामांना लवकरच निधी मिळवुन देवु असे आश्वासन दिले होते.
पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील साखर कारखान्यांना ऊसाची वाहतुक फार मोठ्या होत असते त्यामुळे
रस्त्यांची दुरावस्था होते. रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी स्थानिक शेतकर्यांनी, नागरीकांनी सदरचे रस्ते दुरूस्तीसाठी आमदार प्रशांत परिचारक यांचेकडे मागणी केली होती. त्याअनुषंगाने अर्थसंकल्प अधिवेशन 2021-2022 मध्ये आमदार प्रशांत परिचारक यांनी शासनाकडे निधीची मागणी केली. त्यानुसार या कामासाठी शासनाने रक्कम रू.21 कोटी मंजूर केले असल्याची माहिती दिली.
1) मंगळवेढा-पाटखळ-गोणेवाडी-शिरसी रस्ता रा.मा.156 वर किमी 9/950 वर लहाण पुल
बांधणे रक्कम रू.1.00 कोटी 2) मंगळवेढा-पारे-जत-विळुर रस्ता रा.मा.156 किमी 0/000 ते 6/000 मध्ये
सुधारणा करणे ता.मंगळवेढा रक्कम रू.2.00 कोटी 3) खर्डी-तावशी-एकलासपूर-नेपतगांव रस्ता रा.मा.393
किमी 51/680 ते 55/680 मध्ये सुधारणा करणे ता.पंढरपूर रक्कम रू.1 कोटी 50 लाख 4) गुंजेगांव-
आंधळगांव-पाटखळ-नंदेश्वर-भोसे-हुन्नुर ते राज्य हद्द रस्ता रा.मा.391 किमी 48/850 ते 54/500 मध्ये
पुलाचे बांधकाम व रस्त्याची सुधारणा करणे रक्कम रू.1 कोटी 50 लाख, 5) घेरडी-बाळु न्याची वाडी-हुन्नुर-
मारोळे रस्ता रा.मा.389 किमी 38/000 ते 47/000 मध्ये सुधारणा करणे ता.मंगळवेढा रक्कम रू.1 कोटी 50
लाख, 6) खर्डी-तावशी-एकलासपूर रस्ता रा.मा.393 किमी 45/500 मध्ये पुलाचे बांधकाम करणे
ता.पंढरपूर रक्कम रू.2.00 कोटी, 7) गुंजेगांव-आंधळगांव-पाटखळ-नंदेश्वर-भोसे-हुन्नुर ते राज्य हद्द रस्ता
रा.मा.391 किमी 55/000 ते 65/000 मध्ये रस्त्याची सुधारणा करणे ता.मंगळवेढा रक्कम रू.4.00 कोटी 8)
धर्मगांव-मल्लेवाडी-घरनिकी-मारापूर-लक्ष्मी दहिवडी रस्ता प्रजिमा 76 किमी 0/000 ते 8/200 मध्ये
सुधारणा करणे रक्कम रू.4.00 कोटी 9)प्रजिमा-72 ते महमदाबाद-लोणार-पडोळकरवाडी रस्ता-162 किमी
0/000 ते 6/000 रस्ता सुधारणा करणे रक्कम रू.3 कोटी 50 लाख एकुण रक्कम रू.21.00 कोटीचा निधी
मंजूर केला असून लवकरच सदरची कामास सुरूवात होईल असे आश्वासन आ.प्रशांत परिचारक यांनी ही माहीती देताना दिले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.