पंढरपूर एक तीर्थक्षेत्र आहे, देशाची दक्षिणकाशी म्हणून पंढरपूर ची ओळख आहे, याच पंढरपूर ने महाराष्ट्राला नव्हे तर संबंध देशाला अनेक हिरे दिले मग ते राजकारण असो की समाजकारण असो,कला, क्रीडा,शिक्षण,कृषी,उद्योग,विज्ञान या सारख्या विविध क्षेत्रात याच पंढरी मधील व्यक्तींनी पूर्ण देशात नाव कमावले,परंतु शोकांतिका इतकीच की यातील बहुतेक लोकांनी पुन्हा पंढरपूर कडे डुंकून ही पाहिलं नाही, त्यांनी आपल्या पंढरीकडे म्हणावे तितके लक्ष दिले नाही, पंढरीच्या विकासाचे व्हिजन क्वचितच लोकांनी डोळ्यासमोर ठेवले, अनेकांनी पंढरीतील तरुणांना नेमकं काय हवं..?? याचा जरासाही विचार केला नाही, खरं तर पंढरीच्या विकासाचा मास्टर प्लॅन आजपर्यंत कोणी बनवलाच नाही, पंढरीची दिशा आणि दशा बदलवनेसाठी प्रबळ इच्छाशक्ती असणे गरजेचे होते;पण प्रत्यक्षात असं घडलं नाही,आणि त्याच मुळे पंढरपूर आज ही विकासापासून वंचित राहिले आहे, पण ही पंढरपूर ची शोकांतिका पुसून काढणेसाठी पांडुरंगाने एका अतिशय कणखर, दुर्दम्य इच्छाशक्ती असलेला,अभ्यासू, कर्तृत्ववान,धाडसी आणि पंढरीच्या विकासाचे व्हिजन असलेल्या माणसाला तयार केलं आणि तो व्यक्ती म्हणजे अभिजित धनंजय पाटील उर्फ आबासाहेब...!!
पेशाने वकील असलेल्या धनंजय पाटलांच्या घरी आबासाहेबांचा जन्म झाला, लहानपणापासून चंचल आणि तल्लख असलेल्या या माणसाने हजारो उद्योग केले, लेबर कॉन्ट्रॅक्टर ते ऊस वाहतूकदार म्हणून काम केलं,हाती लागेल ते काम केलं, मिळेल त्या व्यवसायाचा अनुभव घेतला,पण कधी अपयश आलं म्हणून कष्ट करणं, एखादी गोष्ट समजून घेणं सोडलं नाही, तर उलट त्या गोष्टींच्या मागे हात धुवून लागले, आणि अखेरीस यश मिळवलेच..!!
समृध्दी ट्रॅक्टर च्या माध्यमातून तसेच डिव्हीपी मल्टिप्लेक्स व मॉल च्या माध्यमातून पंढरपूर च्या उद्योग व्यवसायात व समाजकारणात या व्यक्तीने प्रवेश केला तो मागे वळून न बघण्यासाठीच...!!
तेथून पुढे हॉटेल विठ्ठल कामत, धाराशिव साखर कारखाना, नांदेड चा कारखाना व नाशिक चा साखर कारखाना, सोलापूर सोसिएल फौंडेशन, डिव्हीपी चे दि पीपल्स मल्टिस्टेट को ऑपरेटिव्ह बँक, इत्यादी उद्योग व्यवसायात उत्तुंग भरारी घेतली,या सर्व उद्योगात आपल्या गावातील, परिसरातील हजारो बेरोजगार तरुणांना पोटास लावले, तसेच तीन कारखान्याच्या माध्यमातून तीन हजार लोकांच्या हाताला काम दिलं, आणि हा माणूस आज ही पंढरीतील तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी झोकून देतोय.....!!
आजपर्यंत हजारो नवयुवकांना स्वतः सकारात्मक बनवून उद्योग उभा करून दिले आहेत, आज ही हा माणूस पंढरीतील हजारो युवा मुलांना उद्योग क्षेत्रात घेऊन येतोय, येत्या काळात पंढरपूर तालुका हा उद्योजकांचा तालुका म्हणून ओळखला गेला पाहिजे हे त्या विलक्षण अवलीयाने उराशी स्वप्न बाळगले आहे, आणि ते त्यांचं स्वप्न निश्चित च पूर्ण होणार यात शंका नाही यात शंका नाही...!!
जो व्यक्ती पूर्ण बंद अवस्थेत असलेले साखर कारखाने खरेदी करून त्यांना उर्जितावस्था आणत असेल, तर या पंढरपूर मधील चालत्या बोलत्या तरुणांना जागे करून, त्यांच्या बरोबर चालून त्यांना धावतं करायला यांना वेळ लागणार नाही, प्रचंड इच्छा शक्ती, पराकोटीची जिद्द, दृढ निर्धार आणि अतिव मेहनत करण्याची तयारी असलेला हा माणूस भविष्यातील पंढरपूर शहराचा तसेच, येथील अर्थकारणाचा, समाजकारणाचा आणि उद्योगी आणि व्यावसायिक तरुणाईचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय शांत बसणार नाही हे नक्की..!!

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.