सोलापूर // प्रतिनिधी
तीन महिन्यापूर्वी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार स्वर्गीय भारत नाना भालके यांचे दुःखद निधन झाले होते यानंतर पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाची आमदारकी ची जागा रिक्त असून या जागेसाठी संपूर्णपणे अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असून पंढरपूर व मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी व निवडून येण्यासाठी ज्या त्या क्षमतेचा व विचारसरणीचाच उमेदवार असावा अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. पुढील उमेदवार कोण तू किती ताकतीचा आहे या सर्वांचा लेखाजोखा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार निवडणार असून यामध्ये पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघासाठी पंढरपूरचे उद्योजक व धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित धनंजय पाटील यांच्या नावाची सर्वात जास्त पसंती असल्याचे राजकीय जाणकार कोण बोलले जात आहे यामध्ये पंढरपूर मंगळवेढा तालुक्यांमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांचे एक चांगले जाळे निर्माण केले असून जो कोणी त्यांच्याकडे जाईल त्यांना ते आपलेसे केल्याशिवाय राहात नाहीत. अभिजीत धनंजय पाटील म्हणजे एक ब्रँड तयार झाला असून पंढरपूर व मंगळवेढा मतदार संघामध्ये त्यांना कोणी ओळखत नाही असा एक सुद्धा सर्वसामान्य नागरीक तुम्हाला सापडणार नाही.
पंढरपूर मंगळवेढा तालुक्यामध्ये आजपर्यंत त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम चांगल्या पद्धतीने राबविल्या आहेत व त्यांनी आपल्या उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून सर्व गोरगरीब व दीनदलितांना योग्य प्रकारे न्याय दिला आहे याबाबतीत त्यांनी काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद चंद्रजी पवार साहेब यांची मुंबई येथे भेट घेतली होती त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत रावजी पाटील त्याचबरोबर इतर नेतेमंडळींची सुद्धा भेट घेत सर्वांना एक आश्चर्याचा सुखद धक्का दिला होता. मंगळवेढा विधानसभा मतदार संघासाठी अभिजीत पाटील हेच राष्ट्रवादीकडून योग्य उमेदवार आहेत. जसजशी निवडणुकीचा दिवस जवळ येत आहेत तसतसे अभिजीत पाटील यांचे नाव सर्वच उमेदवारांमध्ये प्रथम क्रमांकाला घेतले जात आहे त्यामुळे अभिजीत पाटील हे थोड्या दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवारी घेऊन मुंबईतून माघारी येतात का? अशी त्यांच्या सर्व समर्थक व कार्यकर्त्यांमधून चर्चा होताना दिसत आहे.
याचबरोबर पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमध्ये आज पर्यंत जर राजकीय इतिहास पाहिला तर एम कार्ड ही जमेची बाजू असून याचा सर्वाधिक फायदा अभिजीत आबा पाटील यांना मी येणार आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा एका नव्या चेहऱ्याच्या शोधात असल्याचे सुद्धा समजते याच बरोबर इतर कोणाला उमेदवारी देण्यापेक्षा अभिजीत पाटील यांना जर उमेदवारी दिली तर पंढरपूर मंगळवेढा मतदार संघावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व प्रस्थापित करता येईल या भूमिकेतून पक्षाचे अध्यक्ष आदरणीय खा. माननीय शरदचंद्रजी पवार साहेब व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब हे योग्य निर्णय घेतील व अभिजीत पाटील यांना उमेदवारी मिळेल असे तरी सध्या चित्र पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमध्ये निर्माण झालेले आहे.
सध्या तरी आपण वाट पाहू यात की पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघामध्ये कोण राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी घेऊन बाजी मारतो; व आगामी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार होतो.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.