मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठाने सोमेश क्षिरसागर यांची याचिका पुन्हा फेटाळली.
मोहोळ व इंदापूर तालुक्यातील विरोधकांच्या पदरी पुन्हां अपयशच
वृत्तसंस्था // प्रतिनिधी
मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे पराभूत उमेदवार नागनाथ क्षिरसागर यांचा मुलगा सोमेश क्षिरसागर यांनी शेळगाव(ता.इंदापूर)येथील सुपुत्र व राष्ट्रवादी कॉग्रेस चे मोहोळ(जि.सोलापूर)तालुक्याचे आमदार यशवंत विठ्ठल माने व त्यांचे बंधू हनुमंत विठ्ठल माने यांचा विरोधात जातीचा दाखल व जात वैधता प्रमाणपत्र हे अवैध असल्याची दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळली आहे. उच्च न्यायालयाच्या निकालामुळे पुन्हा एखाद्या आमदार यशवंत विठ्ठल माने व कुंटुंबाचे जातीचा दाखल व जात वैधता प्रमाण पत्राबद्द्ल खरेपणा समोर आला आहे.
जिल्हा जात पडताळणी समिती बुलढाणा यांनी आमदार मा यशवंत विठ्ठल माने व त्यांचे बंधू हनुमंत विठ्ठल माने यांचा जातीचा दाखला व जात वैधता प्रमाणपत्र वैध असल्याचा निकाल यापूर्वी २२ सप्टेंबर २०१८ व ६ नोव्हेंबर २०२० रोजी व नागपूर खंडपीठाने ३१ ऑगस्ट २०२० रोजी दिला असून.तरी देखील सोमेश क्षिरसागर यांनी याचिकेला आवाहन म्हणून आमदार श्री यशवंत विठ्ठल माने व बंधू हनुमंत विठ्ठल माने यांचे जातीचा दाखला व जात वैधता प्रमाणपत्र अवैध असल्याची याचिका दाखल केली होती. अखेर ७ जानेवारी २०२१ रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठाने(101/2021) पुन्हा सोमेश क्षिरसागर यांची याचिका फेटाळली आहे.
यामुळे राजकीय व्देषातुन इंदापूर तालुक्यातील छुपे विरोधकांच्या मदतीने मोहोळ चे सोमेश क्षिरसागर यांनी दाखल केलेली याचिका ही पून्हा एखादा पूर्णतः खोटे असल्याचे उच्च न्यायालयाच्या निकालानंतर सिध्द झाले असून आमचा न्याय देवतावर पूर्ण विश्वास आहे. शिवाय न्यायालयाच्या निकालानंतर पुन्हा एखादा इंदापूर व मोहोळ तालुक्यातील विरोधकांच्या पदररी मोठे अपयश आले आहे. असे ही यावेळी आमदार यशवंत विठ्ठल माने* यांनी सांगितले आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.