सोलापूर // प्रतिनिधी
महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबीत पी.एस.आय.सचीन वाझे यांना महिन्याला 100 कोटी रूपये गोळा करण्याचे टार्गेट दिले होते. असा गौप्यस्फोट मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे. परमबीर सिंग यांनी केलेले विधान अत्यंत गंभीर स्वरूपाचे असून त्याची नैतीक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री अनील देशमुख यांनी तात्काळ राजीनामा द्यावा व सदरच्या घटनेची सी.बी.आय. मार्फत चौकशी करण्यात यावी अन्यथा मुख्यमंत्री साहेबांनी त्यांचा राजीनामा घ्यावा अन्यथा तसे न केल्यास मोहोळ तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात तीव्र प्रकारचे निषेध आंदोलन करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन मोहोळ तहसील कार्यालयाचे प्रतिनिधी यांना देण्यात आले.
यावेळी मोहोळ तालुका भारतीय जनता पार्टीचे नेते लोकसेवक संजय आण्णा क्षीरसागर,भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष शंकरराव नाना वाघमारे,मोहोळ तालुका भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष सुनील (दादा) चव्हाण, सतीश दादा पाटील, महेश सोहनी, मदनजी कुलकर्णी, मुजीबभाई मुजावर, औदुंबर वाघमोडे, संतोष नामदे, पप्पू लांडगे,जगन्नाथ वसेकर,शाहूराव वामन सोनटक्के, दिगंबर बाबा वसेकर, स्वपनील दगडू डोंगरे, संतोष रामलिंग पासले, आबा क्षिरसागर, लतीकाताई बनसोडे ई. यावेळी उपस्थित होते

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.